Zomato Q4 Results: झोमॅटोने कमावला मोठा नफा; चौथ्या तिमाहीचा आकडा 175 कोटी रुपये

Zomato Q4 Results: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने सोमवारी 31 मार्च 2024 रोजी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या तिमाहीसाठी त्यांनी 175 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावल्याची घोषणा केली आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 189 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तसेच या कंपनीचे चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (Q4 FY24) वित्तीय उत्पन्न 3,562 कोटी रुपये इतके झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या कालावधीत 2,056 कोटी रुपये होते.

झोमॅटोचा असा आहे निकाल: (Zomato Q4 Results)

झोमॅटोने याच सुमाराला त्यांच्या Blinkit व्यवसायाचा मार्च 2024 मध्ये समायोजित EBIDTA सकारात्मक केल्याचेही सांगितले. झोमॅटोची Gross Order Value (GOV) त्यांच्या मुख्य फूड डिलिव्हरी व्यवसायातील सर्व ऑर्डर्सची एकूण किंमत या तिमाहीत 28 टक्क्यांनी वाढली तर ब्लिंकिटची GOV ची किंमत तब्बल 97 टक्क्यांनी वाढली आहे.

दुसरीकडे, मार्केटिंग आणि विक्री जाहिरातींवरील खर्च वाढल्यामुळे झोमॅटोचा एकूण खर्च जवळपास 50 टक्क्यांनी वाढला असल्याचे कंपनीने जाहीर केले. कंपनी द्रुत व्यापार व्यवसायात (Quick Commerce Business) झपाट्याने स्टोअर विस्तार करत आहे. ते मार्च 2025 पर्यंत 1,000 स्टोअर्सची संख्या गाठण्याचे लक्ष्य ठेऊन कार्यरत आहेत. कंपनीच्या आजच्या बाजारी कामगिरी बद्दल बोलायचं झाल्यास झोमॅटोच्या शेअर्सची किंमत आजच्या दिवसाच्या शेवटी 1.46 टक्क्यांनी घसरून 198.45 रुपये झाली होती(Zomato Q4 Results).

Leave a Comment