Fractional Investment: आपल्यासाठी गुंतवणूक करणे हा नेहमीच आव्हानात्मक विषय राहिला आहे. परंतु आता नवीन तंत्रज्ञान आणि आर्थिक सुधारणांमुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. या बदलांचाच एक भाग म्हणजे Fractional Investing ही नवीन संकल्पना होय. तरुणांमध्ये Fractional Investment मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालली आहे. Grip Invest च्या अहवालानुसार, Fractional Investment करणाऱ्या लोकांपैकी जवळपास 60 टक्के लोकं तरुण मंडळी आहेत.
Fractional Investment म्हणजे काय?
Fractional Investment ही पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा वेगळी पद्धत आहे. पारंपारिक गुंतवणुकीमध्ये आपल्याला संपूर्ण मालमत्ता किंवा शेअर खरेदी करावे लागतात. मात्र Fractional Investment हा विषय थोडासा वेगळा म्हणावा लागेल, इथे आपण संपूर्ण गुंतवणूक न करता फक्त एक छोटासा हिस्सा खरेदी करू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर इथे तुम्ही अगदी कमी पैशात मोठ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकता.
Fractional Investment चे फायदे कोणते?
Fractional Investment चे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही प्रमुख मुद्दे सांगायचे झाल्यास पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा Fractional Investment मध्ये तुम्हाला कमी पैसे गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध असल्याने आर्थिक बचत नसलेल्या तरुणांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो. Fractional Investment मध्ये विविध प्रकारे गुंतवणूक करता येते, म्हणजेच वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही थोडी फार गुंतवणूक करू शकता आणि यामुळे एका क्षेत्रातील नुकसानी दुसऱ्या क्षेत्रातील नफ्याने भरून निघण्याची शक्यता असते. सर्वात शेवटी Fractional Investment मध्ये पारंपारिक गुंतवणुकीपेक्षा जास्ती परतावा मिळण्याची शक्यता असते.