Reliance Industries: अंबानींच्या व्यवसायाला “रिलायन्स” नाव कोणी दिले; याचा अर्थ काय?

Reliance Industries: मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. रिलायन्सच्या चर्चा जरी सर्वत्र होत असल्या तरी कधी तुम्ही या कंपनीच्या नावाबद्दल विचार केला आहे का? अंबानींच्या या कंपनीचं नाव रिलायन्स का ठेवलं असेल आणि कुणी? चला तर मग अंबानींच्या या कंपनीबद्दल जाणून घेऊया…

आरंभकाल आणि नावांमधील बदल: (Reliance Industries)

ही गोष्ट सुरू होते रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्यापासून. वर्ष 1950 मध्ये त्यांनी यमनमध्ये माजिन नावाच्या कंपनीसोबत त्यांचा प्रवास सुरू केला होता आणि ही कंपनी मसाले आणि पॉलिस्टर धागे आयात करायची. आज रिलायन्सचा वाढलेला अवाढव्य व्यवसाय सांभाळणारा हा तो मूळ पाया होता. नंतर 1960 च्या काळात धीरूभाई आणि त्यांचे चुलत भाऊ चंपकलाल दमानी भारतात परत आले आणि Reliance Commercial Cooperation नावाचे नवीन उद्योग सुरु केला.

रिलायन्स हे नाव का?

“रिलायन्स” हे नाव निवडले जाणे केवळ योगायोग नाही. धीरूभाईंना त्यांच्या कंपनीला विश्वासाचे प्रतीक बनवायचे होते, अशी एक कंपनी जी असाधारण उत्पादने आणि सेवा देऊ शकेल. ते आत्मनिर्भरेतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवायचे आणि त्यांना ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे नाव त्यांना ठेवायचे होते.

काय मजेदार बाब म्हणजे, “रिलायन्स” याचा अर्थ “विश्वसनीय” किंवा “आधारभूत” असा होतो(Reliance Industries), म्हणूनच धीरूभाई सुरुवातीच्या तीन नावांच्या बदलांनंतरही याच शब्दाशी सहमत झाले, कारण या शब्दाने त्यांची कंपनीविषयीची कल्पना अगदी परिपूर्णपणे व्यक्त केली होती.

Leave a Comment