Demat Features: कोविड-19 महामारीनंतर, आर्थिक समावेशनावर भर दिला जाण्याची गरज जगभरात जाणवू लागली आहे. याचाच अर्थ असा, की समाजातील सर्व लोकांना आर्थिक सेवांचा समान हक्क मिळणे गरजेचे आहे, याअगोदर आर्थिक सेवांपासून वंचित राहिलेल्या लोकांनाही गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याचा आर्थिक समावेशनाचा प्रमुख उद्देश आहे आणि याला गती देणारे एक महत्वाचे साधन म्हणजे डिमॅट खाते (Demat Account) होय. मात्र डिमॅट खाते आणि आर्थिक समावेशनाचा काय संबंध हे आज जाणून घेऊया…
आर्थिक समावेशन म्हणजे काय? (Demat Feature)
जेव्हा सर्वांना बचत खाते, कर्ज, विमा आणि शेअर्ससारख्या गुंतवणूकीच्या समान संधी मिळते तेव्हा त्याला आर्थिक समावेशन असे म्हणतात. आर्थिक सेवांची उपलब्धता ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते. अचानक ओढवलेल्या कठीण परिस्थितींमध्येही तग धरुन उभे राहण्यासाठी व्यक्ती आणि व्यवसायांना अश्या आर्थिक सेवांची गरज भासते.
डिमॅट खाते आणि फायदे:
डिमॅट खाते हे एक इलेक्ट्रॉनिक खाते आहे. यामध्ये शेअर्स, Bonds, Mutual funds आणि Exchange Traded Funds (ETFs) सारखी गुंतवणूक डिजिटल स्वरुपात सुखरूप ठेवली जाते. पारंपारिक पद्धतीमध्ये आपण कागदी स्वरुपातील शेअर सर्टिफिकेट जपून ठेवायचो मात्र डिमॅटच्या वापरामुळे ही आवश्यकता नाहीशी होत चालली आहे, परिणामी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे आणि पैश्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होत चालले आहे.
याशिवाय, डिमॅट खात्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि पारदर्शी प्लॅटफॉर्म मिळतो आणि आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास वाढायला मदत होते(Demat Feature). एवढंच नाही तर गुंतवणूकदारांना सुशिक्षित निर्णय घेण्यासाठी डिमॅट खाते मार्गदर्शन करते. आजच्या जगात आर्थिक समावेशनाच्या दिशेने डिमॅट खाते हे एक मोठे पाऊल ठरले असून, भविष्यात याचा आणखी व्यापक लाभ होईल, यात शंका नाही.