Income Tax: आयकर विभागाने आणली पारदर्शकता; AIS मध्ये महत्वाचे बदल

Income Tax: आयकर विभागानं (Income Tax Department) आता करदात्यांसाठी महत्वाची बातमी समोर आणली आहे. विभागानं आता वार्षिक माहिती विवरणपत्र (Annual Information Statement – AIS) मध्ये माहितीची पुष्टी करण्याची प्रक्रिया आणखी पारदर्शी करण्यासाठी नवीन कार्यक्षमता सुरु करण्याचा निर्णय पक्का केला आहे.

काय आहे AIS? (Income Tax)

AIS ही करदात्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती असलेले विवरणपत्र आहे. बँका, वित्तीय संस्था, सरकारी विभाग इत्यादी विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या आर्थिक माहितीवरून AIS तयार केले जाते. या विवरणपत्रात करदात्यांशी संबंधित अनेक आर्थिक व्यवहारांची माहिती असते ज्याचा करावर परिणाम होऊ शकतो.

AIS मध्ये आता करदात्यांना प्रत्येक व्यवहारावर अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. याचा अर्थ असा की, करदात्यांना त्यांच्या विवरणपत्रात दाखवलेल्या माहितीची अचूकता तपासण्याची आणि त्यावर भाष्य करण्याची संधी मिळणार आहे. जर एखादी माहिती चुकीची असेल तर, कर विभाग स्वयंचलित पद्धतीने माहिती देणाऱ्या स्त्रोतांकडे त्याची पुष्टी करते आणि आता नवीन कार्यक्षमतेमुळे करदात्यांना त्यांच्या अभिप्रायावर स्त्रोतानं काय कारवाई केली याची माहिती मिळणार आहे(Income Tax).

Leave a Comment