7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ; “या 6” भत्त्यांमध्ये होणार वाढ

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आजची ही बातमी फारच महत्वाची आहे. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार केंद्र सरकार कडून 6 विविध प्रकारच्या भात्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून महागाईच्या भत्त्यात 4 टाक्यांची वाढ केली असल्याने महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आजची ही बातमी मात्र शेवटपर्यंत वाचा कारण हे सहा प्रकार कोणते आणि याचा तुम्हाला नेमका काय फायदा काय याच उलघडा आज आम्ही करणार आहोत.

भत्तावाढ करवण्यात आलेले 6 प्रकार कोणते? (7th Pay Commission)

१) जोखीम भत्ता: नावाप्रमाणेच जी लोकं जोखमीची कामं करतात त्यांना हा भत्ता दिला जातो किंवा ज्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर कामामुळे वाईट परिणाम होण्याची शक्यता असेल अश्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळतो.

२) नाईट ड्युटी भत्ता: जे कर्मचारी रात्रीच्या वेळेस काम करतात, (रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत) त्यांना मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करवण्यात आली आहे.

३) बालशिक्षण भत्ता: ज्या कर्मचाऱ्यांना दोन मुलं आहेत अश्या कर्मचाऱ्यांना बालशिक्षण भत्ता दिला जातो आणि आता केंद्र सरकारकडून या भात्यात वाढ करवण्यात आली आहे, यातही जर का एखाद्या कर्मचाऱ्याला दिव्यांग असलेलं मूल असेल तर महागाईचा दुप्पट भत्ता दिला जातो.

४) ओव्हरटाईम भत्ता: नावाप्रमाणेच जे कर्मचारी आखून दिलेल्या वेळेपेक्षाही जास्ती काम करतात त्यांना हा भत्ता दिला जातो(7th Pay Commission).

५) दिव्यांग महिला कर्मचारी भत्ता: या भत्यांतर्गत ज्या महिला दिव्यांग आहेत त्यांना मुलांची काळजी घेण्यासाठी दरमहा 3000 रुपये विशेष भत्ता दिला जाणार आहे. मुलाचा जन्म झाल्यापासून ते मूल दोन वर्षांचं होईपर्यंत सरकारकडून ही आर्थिक मदत पोहोचवण्यात येईल.

६)संसदीय सहाय्यक भत्ता: संसद अधिवेशनाच्यावेळी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भात्याच्या तुलनेत 50 टक्के अधिक भत्ता दिला जाणार आहे. कमीतकमी 15 दिवस अधिवेशन सुरू असलेल्या प्रत्येक महिन्यासाठी हा भत्ता दिला जाईल.

Leave a Comment