LIC Scheme: मुलीच्या जन्माबरोबरच तिच्या शिक्षण आणि लग्नाची चिंताही पालकांना वाटते आणि आजही या चिंतेत जराही कमतरता जाणवत नाही. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्चही आकाशाला गवसला आहे. अशावेळी मुलीच्या भविष्याची आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतं. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मुलींच्या भविष्यासाठी खास ‘कन्यादान’ योजना घेऊन आली आहे. तुमची देखील एखादी छोटी मुलगी असेल आणि तिच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
काय आहे ही योजना? (LIC Scheme)
लाडक्या लेकीसाठी तयार करण्यात आलेली ही योजना रोज फक्त 121 रुपये एवढी किरकोळ रक्कम जमा करून मुलीच्या लग्नासाठी किंवा शिक्षणाच्या खर्चासाठी जमा करता येऊ शकते. 25 वर्षे ही रक्कम जमा केल्यावर परिपक्वतेच्या वेळी याची किंमत तब्ब्ल 27 लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचू शकते. फक्त इतकंच नाही, तर या योजनेत गुंतवणूक करण्याची अनेक वेगवेगळे पर्याय देखील आहेत. रोज 121 जमा करणं जर का एखाद्याला जमत नसेल तर तो माणूस रोज 75 जमा करू शकतो, त्यानुसार परिपक्वतेच्या वेळी मिळणारी रक्कमही कमी असते 14 रुपयांच्या आसपास जाईल.
योजनेवर मिळतो कर लाभ:
या योजनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कर लाभ. आयकर अधिनियम 80C अंतर्गत या योजनेतून आपण दीड लाख रुपयांपर्यंत कर बचत करू शकता.सर्वात महत्वाचं म्हणजे ही रक्कम फक्त लग्नासाठीच वापरायची असा बंधन नाही. मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागणाऱ्या कोणत्याही खर्चासाठी आपण हा निधी वापरू शकता.
रकमेची तरतूद करणाऱ्याचा जर का मृत्यू झाला तर या योजनेतर्गत आश्रित व्यक्तीला 10 लाखपर्यंत मदत मिळते. उलट परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर तरतूद करणारा मृत्यू पावला तर आश्रित व्यक्तीला 27 लाख मिळतात. तुमच्या लाडक्या लेकीच्या भविष्याची हमी देण्यासाठी LIC ची ही ‘कन्यादान’ योजना खूपच फायदेशीर आहे(LIC Scheme). मुलीचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी ही योजना नक्कीच वरदान ठरेल त्यामुळे नक्कीच याबद्दल अधिक माहिती मिळवा.
Please send full details & how returns calculated on which base. Thank u.