Warren Buffet: गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारताची चमक; वॉरेन बफेटही आकर्षित

Warren Buffet: भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था सध्या देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचे देखील लक्ष वेधून घेत आहे आणि अश्यातच आता यात गुंतवणुक क्षेत्रातील दिग्गज वॉरेन बफेट यांचाही समावेश झाला आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ असलेले वॉरेन बफेट हे आता भारतीय अर्थव्यवस्थेचे चाहते बनले असून त्यांनी भारतात गुंतवणुकीची इच्छुकता दर्शवली आणि येथील संधींबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे.

वॉरेन बफेट भारतात करणार गुंतवणूक: (Warren Buffet)

अलीकडेच बर्कशायर हॅथवे कंपनीच्या वार्षिक बैठकीत पहिल्यांदाच भारताचा उल्लेख झाला. या बैठकीत बफेट यांना विचारले गेले की, त्यांची कंपनी भारत देशात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना बफेट म्हणाले, भारतात गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत. अनेक न उलघडलेली क्षेत्रे आहेत, जिथे गुंतवणुकीकडे अजून लक्ष दिले गेले नाही, यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

जपानमधील आपला गुंतवणुकीचा अनुभव खूप चांगला राहिला आहे, यावरून भारतासारख्या देशातही काही चांगल्या गुंतवणुकीच्या संधी असू शकतात, ज्याकडे सध्या लक्ष दिले गेले नाही. भारतासारख्या देशात संधी शोधण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, असेही त्यांनी नंतर स्पष्ट केले.

वॉरेन बफेट यांची गुंतवणूक:

यापूर्वी वॉरेन बफेट यांनी पेटीएम मध्ये 2.6 टक्के हिस्सा खरेदी केला होता, मात्र नंतर त्यांनी हा वाटा विकला. विशेष म्हणजे, वॉरेन बफेट यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीचे शेअर्स हे जगभरातील सर्वात महागड्या शेअर्समध्ये गणले जातात. त्यांची कंपनी अनेक क्षेत्रातील उद्योगांमध्ये खरेदी आणि गुंतवणूक करते. वॉरेन बफेट हे जगातील सर्वोत्तम गुंतवणुकदारांपैकी एक मानले जातात(Warren Buffet).

भारतीय अर्थव्यवस्थेची चमक आता जगभरात पसरत आहे, त्यामुळे गुंतवणुक क्षेत्रातील दिग्गजांचे भारताकडे लक्ष वेधले जाणे ही भारतासाठी सकारात्मक बाब आहे, यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळण्यास मदत होईल.

Leave a Comment