Virat Kohli: Run-Machine गुंतवणुकीच्या मैदानात; कंपनी लवकरच आणणार IPO

Virat Kohli: आपल्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी जबरदस्त कामगिरी बजावणारा विराट कोहली अनेकांची पसंत आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का विराट सध्या मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही आघाडीवर आहे. इतरांप्रमाणेच विराट कोहली देखील Shares Investment च्या माध्यमातून अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि आता त्यांच्या गुंतवणुकीत येणारी एक कंपनी लवकरच IPO घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.

Go Digit लवकरच आणणार IPO: (Virat Kohli)

बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार, Go Digit General Insurance येत्या 15 मे पासून IPO लाँच करण्याचा विचार करत आहे. या IPO ची रक्कम सुमारे 1500 कोटी इतकी असण्याची शक्यता असून या दरम्यान कंपनी नवीन शेअर्स विकून 1250 कोटी उभारण्याची योजना आखत आहे. Go Digit General Insurance ही कंपनी वाहन, आरोग्य, प्रवास, मालमत्ता इत्यादी विविध प्रकारचे विमा प्रदान करते. Go Digit ने पहिल्यांदा 2022 मध्ये IPO लाँच करण्यासाठी अर्ज केला होता आणि या कंपनीला मार्च 2024 मध्ये IPO लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.

कंपनीमध्ये विराट-अनुष्काची गुंतवणूक:

या कंपनीमध्ये केवळ विराट कोहलीच(Virat Kohli) नाही तर त्याची पत्नी अनुष्का देखील गुंतवणूक करते. फेब्रुवारी 2020 मध्ये, विराट कोहलीने कंपनीचे 2,66,667 शेअर्स विकत घेतले होते आणि या गुंतवणुकीसाठी त्याने एकूण 2 कोटी रक्कम खर्च केली होती. याशिवाय, त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही त्याच दराने 66,667 शेअर्स विकत घेत गुंतवणूक केली होती.

Leave a Comment