UPI Cash Deposit Feature: RBI च्या नवीन सुविधेद्वारे ATM वर रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतीच एक नवीन सुविधा आणली असून ATM द्वारे बँकेत रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. देशभरातील ग्राहकांसाठी बँकेची कार्यप्रणाली आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सेवा आणखीन सुलभ बनवण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे.
RBI ने आणली नवीन सुविधा:(UPI Cash Deposit Feature)
या नवीन सुविधेद्वारे, तुम्ही तुमच्या ATM कार्डाचा वापर करून बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा करू शकता. हे Unified Payment Interface (UPI) तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे आधीच मोबाईल पेमेंटसाठी लोकप्रिय ठरले होते. या तंत्रज्ञानामुळे बँकेत रोख रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान बनली आहे. इथे तुम्हाला लांब रांगेत उभे राहण्याची किंवा डिपॉझिट स्लिप भरण्याची गरज भासणार नाही. मात्र लक्ष्यात घ्या आजून ही सुविधा सर्वत्र उपलब्ध झालेली नसल्याने अद्याप सर्व ATM ही सुविधा देण्यासाठी सज्ज नाहीत.
“या” समस्या विसरू नका:
नवीन तंत्रज्ञानामुळे नेहमीच काही तांत्रिक अडचणी देखील येत असतात. परिणामी इथे तुम्हाला व्यवहारांमध्ये अयशस्वीता, विलंब किंवा रक्कम चुकीच्या खात्यात जमा होणे यासारख्या समस्या येऊ शकतात. डिजिटल रोख रक्कम जमा करण्याच्या सुविधेतून सुरक्षेची चिंता निर्माण होऊ शकते आणि अश्यावेळी आपण hacking किंवा वापरकर्त्याच्या UPI खात्यावर अनधिकृत प्रवेश यासारख्या सायबर धमक्यांचा धोका पूर्णपणे नजरेआड करू नये.
आपल्यापैकी बरेच जण UPI बद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत किंवा त्याचा प्रभावीपणे वापर कसा करावा याची पूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही(UPI Cash Deposit Feature). RBI च्या नवीन सुविधेद्वारे ATM मध्ये रोख रक्कम जमा करणे अधिक सोयीस्कर बनणार आहे. तथापि, तुम्ही मर्यादा आणि शंकांबद्दल जागरूक असणे आवश्यक ठरते.