Unemployment Rate: शहरी भागातील बेरोजगारीचा दर घटला; अर्थव्यवस्था जोमात

Unemployment Rate: भारतातील शहरी भागांमध्ये राहणाऱ्या देशवासियांसाठी ही बातमी फारच आनंदाची ठरू शकते, कारण भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी दरात मोठी घसरण झाली असून आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा दर 6.6 टक्क्यांनी खाली आला आहे. गेल्या वर्षी ही टक्केवारी 7.2 अशी होती. अर्थव्यवस्थेच्या जोरदार वाढीमुळे हा सकारात्मक बदल शक्य झाला आहे.

शहरी भागातील आकडेवारी:(Unemployment Rate)

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) अंदाजानुसार, भारताची अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात 7.6 टक्क्याने वाढली असून हा दर आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत अधिक आहे. Periodic Labour Force Survey (PLFS) च्या बुधवारी जारी झालेल्या आकडेवारीनुसार, शहरी बेरोजगारीचा दर 2024 च्या चौथ्या तिमाहीमध्ये 6.7 टक्क्यांनी खाली आला आहे. या आधीच्या तिमाहीत हा दर 6.8 टक्के होता. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, हंगामाच्या बाहेरच्या काळात रोजगारासाठी ग्रामीण कामगार शहरी भागात स्थलांतरित झाल्यामुळे ही वाढ झाली असावी.

काय म्हणतायत अर्थमंत्री?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या मतानुसार जानेवारी ते मार्च 2024 च्या तिमाहीत जारी झालेल्या Periodic Labour Force Survey च्या आधारे शहरी भागातील कामगार सहभाग दर (LFPR), कामगार लोकसंख्या गुणोत्तर (WPR) यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय आणि म्हणूनच इथल्या बेरोजगारी दरात घट झाली आहे.

पुढे अर्थमंत्र्यांनी महिला बेरोजगारी दरात देखील घट झाल्याचे नमूद केले. जल जीवन मिशन अंतर्गत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणे, उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वच्छ इंधनाचा पुरवठा, स्वच्छता इत्यादी मूलभूत सुविधांची वाढती उपलब्धता महिलांच्या घरकामाचा वेळ कमी करून त्यांना रोजगाराच्या संधी मिळवण्यात मदत करते आणि या सुविधा देशाच्या आर्थिक वाढीत हातभार लावत असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी काबुल केले.

या आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारताची अर्थव्यवस्था सकारात्मक दिशेने वाढत आहे आणि त्याचा परिणाम शहरी रोजगाराच्या वाढत्या संधींमध्ये दिसून येतोय(वUnemployment Rate). मात्र एवढ्यावर खुश होऊन चालणार नाही कारण ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारी दरातील फरक कमी करणे आणि महिलांच्या सहभागाची समानता वाढवण्यासाठी अजूनही प्रयत्न करण्याची गरज आहे.

Leave a Comment