Trade In Rupee: भारतीयांसाठी आनंदवार्ता; रुपयांत व्यापार करण्यासाठी अनेक देश उत्सुक

Trade In Rupee: आपल्या भारताच्या आयात-निर्यात व्यापारात आता मोठे बदल घडणार आहेत. या संधर्भात बोलताना सध्या आपली अनेक देशांसोबत रुपयात व्यापार करण्याच्या करारांवर अंतिम टप्प्यात चर्चा सुरु असल्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केली आहे. आत्ताच्या घडीला लोकसभा निवडणुकांमुळे हा विषय थोडा रखडला असला तरी येत्या काळात याला प्राधान्य दिले जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रुपयांमध्ये होणार व्यवहार: (Trade In Rupee)

आपल्या देशाच्या अर्थमंत्री मंत्री निर्मला सीतारामण यांनीही अमित शाह यांच्या विधानाचे समर्थन केले. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यामुळे आणि रुपयाची किंमत बहुतांश आंतरराष्ट्रीय चलनाच्या तुलनेने स्थिर राहिल्यामुळे अनेक देश रुपयांत व्यापार सुरु करण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकन डॉलर सोडून इतर सर्व चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया स्थिर राहिल्याचं त्यांनी नमूद केलं आणि त्यामुळेच अनेक देश आता रुपयात व्यापार करण्यास इच्छुक आहेत.

जुलै 2022 मध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या परिपत्रकानंतर रुपयात व्यापार सुरु करण्याचा विषय चर्चेत आला. या परिपत्रकानुसार आयात आणि निर्यातीसाठी रुपयात बिले करणे, पेमेंट करणे आणि व्यवहार पूर्ण करणे शक्य होणार आहे. आपल्या शेजारी असलेल्या नेपाल आणि भूटानसारख्या देशांसोबत भारताने आधीपासूनच रुपयात व्यापार सुरु केला आहे. रशियासोबतही राष्ट्रीय चलनात व्यापार करण्याची यंत्रणा आकार घेत असून श्रीलंकेनं आपल्या चलनाच्या यादीमध्ये भारतीय रुपयाचा समावेश केला आहे.

भारताच्या बाजारपेठेचा आकार खूप मोठा आहे आणि येथील वाढत्या मध्यमवर्गीयांची खरेदीची क्षमताही मोठी आहे. वर्ष 2047 पर्यंत भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या 102 कोटींहून अधिक होण्याची शक्यता असल्याचंही सीतारामण यांनी दरम्यान नमूद केलं(Trade In Rupee). रुपयात व्यापार करण्याचे अनेक फायदे असतात. रुपयांत केलेल्या व्यापारामुळे व्यवहार खर्च कमी होणे, किंमतीत पारदर्शकता येणे, व्यवहार जलद होणे, hedging खर्च कमी होणे, रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या परकीय चलनाचा साठा कमी होणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात रुपयाचं स्थान मजबूत होण्याचे फायदे मिळतात.

Leave a Comment