Tesla Layoff: टेस्ला कापणार कर्मचाऱ्यांची संख्या; नेमकं कारण तरी काय?

Tesla Layoff: जगभरातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी झाल्यामुळे कंपनी आपल्या जागतिक कार्यसंस्थेच्या 10 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या आकड्यात कपात करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त फिरत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही माहिती अमेरिकेच्या इलेक्ट्रिक वाहतूक आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील बातम्या देणाऱ्या ‘Electric’ या न्यूज पोर्टलने दिली.

टेस्ला कमी करणार कर्मचारी: (Tesla Layoff)

सोमवारी टेस्ला कंपनीचे CEO इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलचा दाखला देऊन ‘Electric’ या वर्तमानपत्राने ही बातमी दिली. या मेलमध्ये मस्क यांनी सांगितले की, टेस्ला कंपनीचे वाढ जलद गतीने होत आहे, कंपनीने काही विभागांमधील भूमिका आणि जबाबदाऱ्यांची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणूनच हे कर्मचारी कमी करणे गरजेचे आहे.

“हे माझ्यासाठी खूप कठीण आहे, पण हे करावे लागेल, यामुळे पुढच्या वाढीच्या टप्प्यासाठी आम्ही झटपट, नावीन्यपूर्ण आणि आव्हान स्वीकारण्यास उत्सुक राहू शकू,” असे मस्क यांच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे (Tesla Layoff). टेस्लानं नुकत्याच सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार, डिसेंबर 2023 पर्यंत त्यांच्या जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांची संख्या 1,40,473 होती.

Leave a Comment