Tejasvi Surya Investments: भाजपचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या, यांचे नाव येत्या लोकसभा निवडणूकीच्या मुद्द्यात बेंगळुरू मधल्या दक्षिण भागातून जाहीर करण्यात आले आहे. याबद्दलचा अर्ज दाखल करताना तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा सर्वासमोर ठेवला. तेजस्वी सूर्य यांनी जाहीर केलेले आकडे सांगतात की त्यांच्या संपत्तीचे मूल्य वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या 13.46 लाख रुपयांवरून थेट 4.10 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.
तेजस्वी सूर्यांची गुंतवणूक: (Tejasvi Surya Investments)
निवडणूक विभागासमोर सादर केलेल्या आकड्यांनुसार सूर्या यांच्या मुख्य कमाईचा स्रोत Shares आणि Mutual Funds म्हणावा लागेल. त्यांनी 1.79 कोटी रुपये Shares मध्ये तर 1.99 कोटी रुपये Mutual Funds मध्ये गुंतवले आहेत. त्यांच्या Mutual Funds च्या गुंतवणुकीमध्ये 26 funds सामावलेले आहेत. यामध्ये काही प्रसिद्ध funds जसे की कॅनरा रोबेको मल्टी कॅप फंड, HDFC मल्टी कॅप फंड, कोटक स्मॉल कॅप फंड आणि ICICI प्रूडेन्शियल स्मॉल कॅप फंड यांचा समावेश होतो. इतकेच नाही तर त्यांनी इंडस टावर्स, एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया, BSE Limited आणि स्ट्राइड्स फार्मा सारख्या कंपन्यांच्या समभागांमध्येही थेट गुंतवणूक केली आहे.
तेजस्वी सूर्या यांनी गुंतवणुकीच्या सोनेरी सूत्रांवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “SIP, Mutual Funds आणि Shares च्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करणे हाच यशस्वी गुंतवणूकदार होण्याचा सोपा मार्ग आहे. भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाला आहे. वाढता शेअर बाजार आणि भरभराटीला येणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे गुंतवणूकदारांना देशभर फायदा मिळत आहे , आणि मी देखील याच वाढत्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेणारा गुंतवणूकदार आहे.”
तेजस्वी सूर्या यांचा सल्ला:
सूर्य यांनी गुंतवणूकदारांसाठी सल्लाही दिली आहे. ते म्हणाले, “शेअर बाजारात आणि Mutual Funds मधून मिळणाऱ्या जबरदस्त परताव्याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेची झपाट्याने झालेली प्रगती आणि उत्तम प्रशासन होय(Tejasvi Surya Investments). जर तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला हवा असेल तर मी तुम्हाला मोदींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो. यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल.”