Tech Mahindra Share Price: टेक महिंद्राचे CEO आणि MD मोहित जोशी यांनी कंपनीच्या पुनरुत्थानासाठी तीन वर्षांचा रोडमॅप 25 एप्रिल रोजी जाहीर केला आणि या रोडमॅपमुळे कंपनीच्या वाढीचा वेग वाढेल आणि नफाही सुधारेल अशी अपेक्षा केली जात आहे. या रोडमॅप अंतर्गत कंपनीचे लक्ष्य आर्थिक वर्ष 2027 पर्यंत इतर स्पर्धकांपेक्षा वाढून अधिक नफा कमविण्याचे आहे.
टेक महिंद्राचे शेअर्स वाढले: (Tech Mahindra Share Price)
या रोडमॅपनंतर शुक्रवारी 26 एप्रिल रोजी टेक महिंद्राच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली. आधीच्या दिवसाच्या शेवटी 1190 रुपये असलेली ही किंमत शुक्रवारी संपूर्ण दिवसाच्या कार्यकाळात 1344.95 अंकांच्या वर गेली. शेअर बाजारात सकाळी 11.30 वाजता टेक महिंद्राचे शेअर्स 100 पेक्षा जास्त वाढून 1295 इतक्या दरात विक्री होत होते.
कंपनीच्या पुनरुत्थान प्रयत्नांचा भाग म्हणून आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनी मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. यामध्ये संस्थेचे पुनर्गठन, प्रमुख ग्राहकांवर आणि बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करणे आणि नवीन सेवांची सुरुवात करणे यांचा समावेश असेल. तसेच काही कंपन्यांचे टेक महिंद्राशी एकत्रीकरण करणे आणि प्रमुख ग्राहकांचा व्यवसाय वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
खर्च कमी करण्यासाठी ‘Project Fortier’ नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला जाणार आहे. टेक महिंद्राचे CEO मोहित जोशी यांनी कंपनीला पुढे नेण्यासाठी ‘Vision 2027’ ची घोषणा केली आहे (Tech Mahindra Share Price). या प्रोजेक्ट अंतर्गत कंपनी पुढील तीन वर्षांत अनेक मार्गांनी काम करेल.
आर्थिक वर्ष 2026 हे कंपनीसाठी ‘स्थिरीकरणाचे वर्ष’ असेल. या काळात गुंतवणूक सुरू राहील आणि ‘Project Fortier’ ही खर्च कमी करण्याची मोहीम पुढे जाण्याची अपेक्षा आहे. कंपनीला आशा आहे की, तिचा व्यवसाय आर्थिक वर्ष 2027 पर्यंत नफा कमविण्यास सुरुवात करेल.