TCS Q4 Results: टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी TCS ची चौथ्या तिमाहीच्या (Q4) नफ्याची घोषणा झाली आहे. Stock Exchange ला देण्यात आलेल्या माहितीनुसारIT क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा नफा (TCS नफा) 9 टक्क्यांनी वाढून 12,434 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आज कंपनीने नफ्याच्या घोषणेसह डिझिव्हेंडचीही घोषणा केली आहे.
कंपनीचा नफा वाढला: (TCS Q4 Results)
शुक्रवारी मार्च पर्यंतच्या तिमाहीच्या निकालांची घोषणा करताना, TCS ने सांगितले की चौथ्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 9 टक्क्यांनी वाढून 12,434 कोटी झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 11,392 कोटी एवढाच होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, बाजारी तज्ञांचा अंदाज होता की TCS चा निव्वळ नफा हा केवळ 5-6 टक्क्यांनी वाढू शकतो, मात्र कंपनीचा निकाल या अंदाजापेक्षाही बराच पुढे निघून गेला आहे.
कंपनीने केली नवीन घोषणा:
भरगोस नफा कमावल्याची माहिती देण्याबरोबरच टाटा समूहाच्या IT कंपनी TCS ने FY 2023-24 साठी मोठा डिझिव्हेंड जाहीर करण्याची केली आहे. कंपनीने फायलिंगमध्ये 28 रुपये प्रति शेअर डिझिव्हेंड देण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. हा डिझिव्हेंड कंपनीच्या येणाऱ्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) चौथ्या दिवशी सादर करण्यात येईल.
आज बाजाराच्या घसरणीच्या विरुद्ध, TCS चा शेअर (TCS Share) किंचित वाढीसह हिरवावर बंद झाला(TCS Q4 Results). TCS चा शेअर 0,48 टक्क्यांनी वाढून 4,003.80 रुपयांवर बंद झाला. वाढत्या शेअरच्या आधारे, TCS ची मार्केट कॅप 14.50 लाख कोटी झाले आहे.