Stock Market: भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवशी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी बंद ठेवला जातो, पण काही अपवाद असल्यास मात्र या दिवशी बाजारात दैनंदिन कामकाज सुरु ठेवले जातात . तुम्ही जर का शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी नक्की वाचाच कारण आगामी शनिवारी, म्हणेजच 18 मे 2024 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) एक विशेष थेट ट्रेडिंग सत्र आयोजित करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधी वर्ष 2024 मध्ये 2 मार्च रोजी देखील असेच एक विशेष सत्र झाले होते.
हे विशेष सत्र का घेणार? (Stock Market)
हे विशेष सत्र NSE ची आपत्कालीन पुनर्प्राप्ती (Disaster Recovery – DR) साइट चाचणी घेण्यासाठी ठेवण्यात आले आहे. DR साइट ही एक backup सुविधा असते जी मुख्य साइटवर अडथळा आल्यास ट्रेडिंग पुन्हा सुरू करण्यासाठी वापरली जाते. DR साइटची चाचणी घेऊन NSE कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे हे निश्चित केलं जातं.
हे विशेष ट्रेडिंग सत्र दोन सत्रात विभागले जाणार आहे:
- पहिले सत्र: सकाळी 9:15 वाजेपासून ते सकाळी 10:00 वाजेपर्यंत मुख्य साइटवर ट्रेडिंग केले जाईल.
- दुसरे सत्र: दुपारी 11:45 वाजेपासून दुपारी 12:40 वाजेपर्यंत ट्रेडिंग DR साइटवर स्थानांतरित केली जाईल.
- या विशेष सत्रादरम्यान फक्त Equity and Equity Derivatives ची खरेदी-विक्री करता येईल. त्याचबरोबर, यादरम्यान शेअर्सची किंमत मर्यादा जास्तीत जास्त 5 टक्के राहणार आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात इच्छुकांना या विशेष ट्रेडिंग सत्राची माहिती असावी आणि त्यानुसार त्यांनी आपल्या गुंतवणूकीची योजना करावी. हे विशेष ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजाराची लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी उचलेले गेलेले महत्वाचे पाऊल आहे (Stock Market). आपत्कालीन पुनर्प्राप्ती साइटची चाचणी घेऊन NSE ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या अडथळ्यांना रोखण्यास आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यास याची मदत होणार आहे.