Stock Market: बाजाराने पकडली तेजी; या आठवड्यात शनिवारी देखील मिळणार गुंतवणुकीची संधी

Stock Market: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी कायम आहे आणि आजही काहीसं हेच दृश्य पाहायला मिळालं. आज Sensex ने 253 अंकांची आणि Nifty ने 62 अंकांची उसळी घेऊन आठवड्यातील उच्चांक गाठले. Bank Nifty 138 अंकांनी वाढला तर Midcap आणि Smallcap निर्देशांकातही वाढ दिसून आली. या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावण्याची संधी मिळाली आहे.

आज कसा होता बाजारी दिवस? (Stock Market)

आजच्या सर्वात मोठ्या वाढीमध्ये Crompton Green Consumer Electrical चा समावेश होता, ज्याचा शेअर 15.57 टक्क्यांनी वाढून 391.90 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात या स्टॉकने 34 टक्के आणि एका वर्षात 53 टक्के परतावा दिला आहे.

इतर शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास Data Partners (7.50%), Affle India (7.43%), Mazagon Dock Shipyard (13%), Bharat Dynamics (12.30%), Discon Technology (8.22%), IRFC (7.20%), Infosys (6.00%), Mahindra & Mahindra (6.00%) आणि IRCTC (5.11%) या शेअर्सचा समावेश होतो.

शनिवारीही बाजार उघडणार:

या आठवड्यात शनिवारी म्हणजेच 18 मे रोजीही शेअर बाजार खुला राहील. सहसा, शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार पर्यंतच खुला असतो. परंतु या आठवड्यात शनिवारी देखील सकाळी 9:15 ते 10 आणि त्यानंतर 11:30 ते 12:30 या दोन सत्रात ट्रेडिंग होणार आहे(Stock Market). शेअर बाजार शनिवार देखील उघडणार असल्याने गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची आणखीन एक संधी मिळणार आहे.

Leave a Comment