Stock Market: काल बाजार बंद होत असताना Small Cap आणि Mid Cap मध्ये सामील असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सनी दमदार कामगिरी करून दाखवली आणि अश्या या महत्वपूर्ण कामगिरीनंतर आज भारतीय शेअर बाजाराला चांगली सुरुवात मिळली आहे. बाजार उघडतानाच आज प्रमुख निर्देशांक Sensex आणि Nifty यांना सकारात्मक सुरुवात कारण्यासाठी अनुकूल वातावरण मिळाले आणि विशेष म्हणजे आज BSE Mid Cap निर्देशांक हा सर्वोच्च विक्रमावर पोहोचला आहे.
बाजाराची सकारात्मक सुरुवात: (Stock Market)
आज सकाळी बाजारी व्यवहार सुरु होताना Sensex 212.21 गुणांनी, म्हणजेच 0.29 टक्क्यांनी वाढून 74,165 वर पोहोचला तर Nifty 47.55 गुणांनी, म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 22,576 वर गेला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात चढ-उतार पाहायला मिळत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे. तज्ज्ञ या वाढीचे श्रेय परदेशी गुंतवणूकदारांच्या भारतीय बाजाराप्रती वाढलेल्या विश्वासाला, देशातील अर्थव्यवस्थेला होत असलेल्या सुधारणेला आणि काही प्रमुख कंपन्यांच्या तिमाही निकालांना देतात.
आता बाजाराला मिळालेली ही गती कायम राहणार का हे पाहायचे आहे(Stock Market), पण सध्या गुंतवणूकदारांमध्ये असलेला आशावाद हा गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा ठरतो. आजच्या चांगल्या सुरुवातीमुळे अलीकडील चढ-उताराला सामोरं जाऊनही भारतीय बाजार अजूनही बळकट असल्याची खात्री पटते.