Stock Market: बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) यांच्याकडून Digital Marketing Solutions कंपनी म्हणजेच Brightcom Groupच्या शेअर्सचं ट्रेडिंग 14 जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने बाजार नियामक SEBIच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्यात घ्या की भारतात होणाऱ्या स्टॉक बाजारातील निर्णय घेण्याचा अधिकार SEBI कडे सोपवण्यात आला आहे.
SEBI चा असा आहे आरोप: (Stock Market)
SEBIने आरोप केला आहे की सदर कंपनीने वर्ष 2014 ते 15 या पाच वर्षांच्या कालावधीत आपला खर्च कमी दाखवून आणि नफा जास्त दाखवून आर्थिक निकालांमध्ये फेरफार केले होते, यामुळे गुंतवणूकदारांना चुकीची माहिती दिली गेली आणि त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेण्यात आला.
या गंभीर आर्थिक गैरव्यवहारांमुळे NSE ने Brightcom Group ला “Z” श्रेणीत टाकले आहे, ज्यामुळे त्याच्या शेअर्सचे ट्रेडिंग पूर्णपणे बंद होते. या निर्णयाचा परिणाम म्हणून 5.7 लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत, ज्यांना आता या कंपनीचे शेअर खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
कंपनीचे शेअर्स घसरले:
Brightcom Groupचे शेअर्स गेल्या दोन दिवसांपासून 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर ट्रेड होत होते, यामुळे अनेक गुंतवणूकदार घाबरले आणि त्यांनी आपले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता हे ट्रेडिंग बंद झाल्याने आता ते असे करू शकणार नाहीत.
या प्रकरणात SEBIने कंपनीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीला आर्थिक दंड भरून आणि SEBIच्या सर्व नियमांचे पालन करून 14 जूननंतर पुन्हा ट्रेडिंगसाठी अर्ज करावा लागेल. जर कंपनीने असे केले नाही तर त्याचे शेअर्स कायमचे निलंबित केले जाऊ शकतात.
या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे(Stock Market). SEBIने गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे की ते गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची संपूर्ण माहिती घ्यावी आणि कोणत्याही गैरव्यवहारांची तक्रार तात्काळ नियामक प्राधिकरणाला करावी.