Stock Market: आठवड्याच्या सुरुवातीला बाजाराची धीमी सुरुवात; कसा असेल दिवसाचा शेवट?

Stock Market: आज आठवड्याचा पहिला दिवस, आज म्हणजेच सोमवारपासून सुरू झालेल्या आठवड्यात शेअर बाजाराला पुन्हा एकदा उतरतीकळा लागली आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरु असताना, मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) चा निर्देशांक असलेला Sensex बाजार सुरु होताच 700 पेक्षा जास्त गुणांनी खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange) चा निर्देशांक म्हणजेच Nifty देखील घसरला.

शेअर बाजारात घसरण: (Stock Market)

आज आठवड्याच्या पाहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 72,664.47 अंकांवर बंद झालेला BSE Sensex 239.16 अंकांनी घसरून 72,425.31 वर खुला झाला. Sensex प्रमाणेच शेअर बाजाराचा दुसरा प्रमुख निर्देशांक Nifty देखील खाली आला. तो गेल्या आठवड्यात बाजार बंद होताना 22,055 अंकांवर व्यवहार करीत होता, आणि आज सकाळी 58.70 अंकांनी खाली घसरत Nifty ने 21,996.50 वर व्यवहार सुरु केला होता.

Small Cap आणि Mid Cap ची स्थिती:

आज सकाळी बाजारी व्यवहारात 1472 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1026 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती आणि 183 कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. Mid Cap कंपन्यांच्या बाबतीत बोलायचं तर, बँक ऑफ इंडियाचा शेअर 10.48 टक्क्यांनी घसरून 124.30 रुपयांवर आला, युनियन बँकेचा शेअर 6.76 टक्क्यांनी घसरून 132.45 रुपयांवर आणि PEL चा शेअर 4.15 टक्क्यांनी घसरून 812.45 रुपयांवर येऊन पोहोचला होता.

सकाळी बाजार उघडताच Small Cap कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील घसरण पाहायला मिळाली होती (Stock Market). बाजाराच्या पहिल्याच दिवशी सुरुवात धीमी झाल्याने दिवस संपताना शेअर बाजाराची परिस्थिती काय असेल याकडे गुंतवणूकदारांची नजर लागून राहील.

Leave a Comment