Stock Market Fall: शेअर बाजारात आज मोठा चढउतार पाहायला मिळाला. एका क्षणात विक्रम गाठलेला बाजार शेवटी मात्र घसरला आणि बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी Sensex 75,111 च्या उच्चांकावरून थेट 629 अंकांनी खाली येऊन 74,482 अंकांवर बंद झाला. Niftyने ही आज इतिहास रचला पण शेवटच्या सत्रात मोठी घसरण झाली. Nifty आपल्या सर्वोच्च 22,782 च्या उच्चांकावरून 178 अंकांनी खाली येऊन 22,604 अंकांवर बंद झाला.
कसा होता बाजारी दिवस? (Stock Market Fall)
ही घसरण शेवटच्या एक तासातच झाली. दिवसाच्या सुरुवातीला तर Sensex 129 वर आणि Nifty 36 वर सुरू झाला होता. मात्र दिवसाच्या शेवटी मात्र मोठी घसरण झाली. आजच्या घसरणीत BSE वर टेक महिंद्रा, JSW Steal, टाटा स्टील,HCL Tech, सन फार्मा, TCS, L&T, कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, HDFC आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये घसरण झाली तर दुसरीकडे महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
घसरणीचं कारण काय?
या घसरणाची तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची धोरण बैठक. या बैठकीत व्याजदर कमी होण्याचा अंदाज होता पण तसं झालं नाही, त्यामुळे नफा बुकिंग वाढली आणि बाजार खाली आला (Stock Market Fall). दुसरं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठही घसरत होती आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. तसंच काही कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालांमध्ये अपेक्षेप्रमाणे चमक नव्हती, याचाही फटका बाजाराला बसला.