Stock Market Closing: भारतीय शेअर बाजारात आज मोठी वाढ झाली. गुंतवणदारकांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी कायम राहिली. FMCG, ऊर्जा, फार्मा आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. आज पुन्हा Mid Cap शेअर्समध्ये मोठी खरेदी झाल्याने Mid Cap निर्देशांक सर्वोच्च विक्रमावर पोहोचला. तसेच, बाजाराचे Market Cap देखील सर्वकालीन उच्चांवर पोहोचले.
आज कसा होता बाजार? (Stock Market Closing)
आज बाजार बंद होत असताना BSE Sensex 268 अंकांनी वाढून 74,221 वर बंद झाला, तर Nifty 68 अंकांनी वाढून 22,597 वर बंद झाला, परिणामी भारतीय शेअर बाजाराचे Market Cap पुन्हा एकदा विक्रमी उच्चांवर पोहोचले. BSE वर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे Market Cap आज 416.07 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 414.62 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ असा की, आजच्या सत्रात गुंतवणदारांची संपत्ती 1.45 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
FMCG क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाली, ज्यामुळे Nifty चा FMCG निर्देशांक 784 अंकांनी वधारला. त्याचबरोबर, ऊर्जा,IT, फार्मा, मीडिया, रिअल एस्टेट, हेल्थकेअर आणि तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सही वाढले(Stock Market Closing). मात्र, बँकिंग, Autoआणि मेटल क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. Mid Cap निर्देशांक नवीन विक्रमावर बंद झाला, तर Small Cap निर्देशांक खाली आला.