Stock Market: शेअर बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 7.6 लाख कोटींचे नुकसान

Stock Market: शेअर बाजाराला आज मोठ्या कोसळीचा सामना करावा लागला. Nifty 345 गुणांनी घसरून 22,000 च्या खाली गेला तर, Sensex 1062 गुणांनी घसरून 72,404 च्या पातळीवर बंद झाला. आज बाजारात झालेली घसरण ही या आठवड्यातील सर्वात मोठा घसरण आहे. गेल्या पाच सत्रांमध्ये, Sensex 75,000 वरून सुमारे 72 हजारवर आला आहे, तर Nifty 22,750 वरून 21,957 च्या पातळीवर बंद झाला आहे.

बाजारात मोठी घसरण:(Stock Market)

आज BSE वर लिस्टेड असलेल्या टॉप 30 पैकी 25 कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि केवळ 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, SBI, इन्फोसिस आणि HCL यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. मात्र, घसरण झालेल्या 25 कंपन्यांमध्ये L&T चा वाटा सर्वाधिक होता, यानंतर, Asian Paints, JSW Steel, ITC, Bajaj Finance आणि IndusInd Bank यांच्या शेअर्समध्ये जवळपास 5 टक्क्यांची घसरण झाली आहे.

7.6 लाख कोटींचे नुकसान:

शेअर बाजारात आज गुंतवणदारांना तब्बल 7.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, कारण गुरुवारी, BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 7.6 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे(Stock Market). Heavy Weight कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीलाही Sensex मधील मोठ्या घसरणीचे कारण मानले जात आहे. रिलायंस इंडस्ट्रीज (RIL) आणि लार्सेन अँड टूब्रो (L&T) यांच्या शेअर्समुळे बाजारात मोठी घसरण झाली. आज Bank Nifty 500 पेक्षा जास्त गुणांनी घसरला तर Nifty FMCG 1300 गुणांनी घसरला.

Leave a Comment