Share Market: भारतीय शेअर बाजार आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बंद राहणार आहे. सध्या देशात पाचव्या टप्प्याच्या निवडणूक सुरु असल्याने बाजार बंद ठेवण्यात आला आहे. बाजाराकडून BSEच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली होती आणि त्यानुसार Equity segment, Equity derivative segment आणि Security Lending and Borrowing असे विभाग बंद राहणार आहेत. देशात आज बाजार बंद असल्याने गेल्या आठवड्यात शनिवारी विशेष सत्रामुळे 18 मे रोजी बाजार सुरू होता.
कसा होता शनिवारचा बाजार? (Share Market)
गेल्या सत्रात प्रमुख निर्देशांक Nifty शनिवारी 36 अंकांच्या वाढीसह 0.16 टक्क्यांनी वधारून 22,502 च्या पातळीवर बंद झाला. Sensex 89 अंकांच्या वाढीसह 0.12 टक्क्यांनी वधारून 74,006 च्या पातळीवर बंद झाला. Midcap आणि Smallcap शेअर्स देखील हिरव्या रंगात बंद झाले. Nifty Midcap 100 0.51 टक्क्यांनी आणि Nifty Smallcap 100 0.82 टक्क्यांनी वाढले.
Nifty Media, निफ्टी ग्राहक टिकाऊ वस्तू, Nifty Oil and Gas आणि Nifty Realty या उप-निर्देशांकांमध्ये सर्वाधिक तेजी होती. अनुक्रमे 1.24 टक्के, 0.48 टक्के, 0.47 टक्के आणि 0 .78 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. BSE वर नेस्ले इंडिया, L&T, TCS, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, SBI, एअरटेल, हिंदुस्थान युनिलीव्हर लिमिटेड आणि HCL Techno या फ्रंटलाइन कंपन्यांच्या शेअर्समध्ये 2.33 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
गेल्या ट्रेडिंग सत्रात BSE वर 3,613 शेअर्सचा व्यवहार झाला आणि त्यापैकी 2,415 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 1,073 शेअर्स घसरणीसह बंद झाले. उर्वरित 125 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही(Share Market). आजच्या सुट्टीनंतर उद्या म्हणजे मंगळवारी 21 मे 2024 रोजी देशांतर्गत बाजार पुन्हा सुरू होईल.