Share Market Today: आज म्हणजेच मंगळवारी 21 मे 2024 रोजी भारतीय शेअर बाजारात Sensex आणि Nifty 50 हे प्रमुख निर्देशांक सावध बजाराने व्यापार करीत होते. आजच्या व्यवहारी दिवसात बहुतांश शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली. कदाचित आज गुंतवणूकदार सावधगिरी बाळगून व्यवहार करीत होते.
आज कशी होती कामगिरी? (Share Market Today)
आज Sensex 53 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी घसरून 73,953.31 वर बंद झाला, तर Nifty 27 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 22,529.05 वर बंद झाला. Nifty निर्देशांकात ICICI Bank, HDFC Bank, L&T, Infosys आणि TCS यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे टाटा स्टील, कोल इंडिया, हिंडाल्को आणि पॉवर ग्रिड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.
MIdcap आणि Smallcap बद्दल बोलायचं झाल्यास आज BSE Midcap निर्देशांक 43,223.69 च्या सर्वोच्च विक्रमावर पोहोचला, परंतु शेवटी तो 0.34 टक्क्यांनी वाढून 43,191.88 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला BSE Smallcap निर्देशांक 48099.29 च्या सर्वोच्च विक्रमावर पोहोचला होता मात्र तो होणारी वाढ टिकवून ठेवण्यात अपयशी ठरला आणि 0.18 टक्क्यांनी घसरून 47,873.56 वर बंद झाला.
बाजारातील अनोखा विक्रम:
मुंबईच्या शेअर बाजाराने आज अनोखा विक्रम करून दाखवला, Mid cap आणि Small cap कंपन्यांच्या निर्देशांकांनी नवीन विक्रम नोंदवला. BSE Mid cap निर्देशांक दिवसाच्या व्यवहारा दरम्यान 43,223.69 च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला, शेवटी 0.34 टक्क्यांनी वाढून 43,191.88 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, BSE Small Cap निर्देशांक देखील 48,099.29 च्या नवीन शिखरावर पोहोचला, मात्र दिवसाच्या शेवटी तो 0.18 टक्क्यांनी घसरून 47,873.56 वर बंद झाला.
या वाढत्या गुंतवणुकीमुळे BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले. सोमवारच्या सत्रात 412.4 लाख कोटी असलेले हे बाजारी भांडवल आज 414.6 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले म्हणजे, गुंतवणूदारांनी एकाच दिवसात 2 लाख कोटींहून अधिक रुपये कमावले आहेत.
बाजाराचे भविष्य काय?
सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी बाजारात सावध वृत्ती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर बाजाराची दिशा स्पष्ट होईल. त्याचबरोबर जागतिक बाजारातील घडामोडींचाही बाजारावर परिणाम होईल.(Share Market Today) येणाऱ्या काळात Midcap आणि Smallcap कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे या क्षेत्राकडे गुंतवणुकदारांचे आकर्षण वाढण्याची शक्यता आहे.