Share Market: बाजारात विशेष व्यवहार; सत्रात Sensex 74,000 च्या पार

Share Market: बाजाराचा नियमांनुसार शनिवारी बाजार उघडत नाही मात्र आज भारतीय शेअर बाजारात विशेष सत्र आयोजित केले असल्याने आज सकाळी शेअर बाजार दोन सत्रात विशेष व्यवहारासाठी खुला झाला होता. केवळ काही वेळासाठीच उघडलेल्या या बाजारात Sensex 88 अंकांनी वाढून 74,000 च्या पातळीवर पोहोचला, तर Nifty 35 अंकांनी वाढून 22,502 वर बंद झाला. आजच्या बाजारात BSE च्या 30 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 23 मध्ये वाढ झाली आणि नेस्ले इंडियाच्या शेअरमध्ये सर्वाधिक 2 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

असा होता विशेष दिवस:(Share Market)

आजचे हे विशेष बाजारी सत्र खरं तर शेअर बाजारातील आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची तयारी तपासण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यात, डेटा प्राथमिक साइटवरून वरून आपत्ती पुनर्प्राप्ती (DR) साइटवर हलविण्यात आला. विशेष सत्रात झालेले हे व्यवहार दोन भागांमध्ये विभागलेले होते.

यामध्ये पहिले सेशन सकाळी 9.15 ते 10 आणि दुसरे सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत आखण्यात आले होते. या सत्रात सिक्युरिटीजवर Future and Options उत्पादने उपलब्ध होती त्यांची कमाल किंमत 5 टक्के अशी ठरवण्यात आली होती. या विशेष व्यवहारात Affle India, Cochin Shipyard, IEX, HFCL, Zydus, HAL, Bharat Dynamic आणि Balkrishna Industries यांच्यासारख्या 10 कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ झाली.

सोमवारी बाजार बंद:

या विशेष व्यवहारानंतर 20 मे 2024 रोजी म्हणजेच सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे(Share Market). मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होत असल्याने, या दिवशी कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Leave a Comment