Share Market: 70,000 चा टप्पा पार करणारा Sensex आता 75,000 चा पल्ला पार करून गेला आहे. ही वाढ फक्त चार महिन्यांत झालेली असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल तर 2020 च्या एप्रिलमध्ये कोरोनामुळे देशभर टाळेबंदी झाल्यानंतर Sensex 27,591 अंकांपर्यंत खाली आला होता. पण त्यानंतर मात्र आपल्या अर्थव्यवस्थेने जोरदार पुनरुत्थान केलं आणि यात तब्बल 271 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Sensex वाढण्याचं कारण काय? (Share Market)
Sensex अचानक वाढण्याचं याचं कारण आहे भारताची अर्थव्यवस्था. भारताचा आर्थिक विकास वेग गेल्या चार दशकांपासून सुरू आहे आणि सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे, यामुळे Sensex मधील अनेक कंपन्या ज्या भारतीय बाजारपेठीवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी हा विकास खूप महत्वाचा ठरतो.
2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने देखील आपल्याला सुखद धक्का दिला. प्रमुख केंद्रीय बँकांनी मंदी न आणता महागाई नियंत्रित केली. यंदा 2024 मध्ये अनेक मोठ्या लोकशाही देशांमध्ये निवडणुका आहेत. असा वेळ सामान्यत: अनिश्चिततेचा असतो, पण भारताची परिस्थिती वेगळी आहे. बहुतेक तज्ञांच्या निवडणुकीच्या निकालात काही शंका नाही, त्यामुळे बाजाराला धोरणात्मक स्थिरता दिसून येतेय.
Sensex चे भवितव्य काय?
75,000 हा आकडा आत्तासाठी आपल्याला फार मोठा वाटतोय पण तो 1,00,000 च्या तुलनेत काहीच नाही हे लक्ष्यात घ्या(Share Market), कारण तज्ञांच्या मते 1,00,000 ही पुढची मोठी उंची आहे, त्यांच्या मते पुढच्या पाच वर्षांत ही उंची गाठली जाऊ शकते.