Share Market Opening: आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि आपण या दिवसाला शुभ मानतो. असं म्हणतात वर्षाच्या सुरूवातीला घडलेल्या गोष्टी वर्षभर कायम राहतात किंवा त्याच प्रमाणे घडतात आणि हिंदू नववर्षाप्रमाणे आज वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. Bombay Stock Exchange (BSE)च्या Sensex ने पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार करत नवीन विक्रम नोंदवला आणि याच जोरदार वाऱ्यावर National Stock Exchange (NSE)चा Nifty सुद्धा 22,700 च्या नवीन शिखराकडे झेपावला.
पहिल्या दिवशी बाजार सकारात्मक: (Share Market Opening)
आज सकाळी भारतीय बाजारपेठ मंगळवारी सकारात्मक संकेतांसह जोरदार सुरू झाली. सकाळी 9.15 वाजता BSE Sensex पहिल्यांदाच 75,000 चा टप्पा पार करत 75,124.28 च्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर खुला झाला. Nifty देखील Sensex च्या चालीशी सुसंगत राहत नवीन शिखरावर पोहोचला. NSE च्या Nifty ने देखील 22,765.10 च्या विक्रमी अंकांनी दिवसाची सुरुवात केली. शेअर बाजार सुरू झाल्यावर 1,662 पेक्षा जास्त कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 584 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. यामध्ये 97 कंपन्या अश्याही होत्या ज्यांच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शेअर बाजार काल म्हणजेच नवीन वर्षाच्या आधी मजबूत वाढीसह नवीन उच्च पातळीवर पोहोचला होता आणि आज हाच विक्रमी पराक्रम कायम ठेवताना दिसला (Share Market Opening).सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर, BSE Sensex 428 गुणांच्या वाढीसह 74,724.50 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE Nifty देखील 152.60 गुणांच्या वाढीसह 22,666.30 च्या पातळीवर बंद झाला होता.