Share Market: भारतीय शेअर बाजाराला घसरणीचा झटका; “असा” होता बाजारी दिवस
Share Market: आज भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा निराशाजनक स्थिती पाहायला मिळाली. दिवसाच्या सुरुवातीला झालेली वाढ दिवसाच्या शेवटी मात्र पुन्हा एकदा नाहीशी झाली. Nifty 50 हा महत्वाचा निर्देशांक 17 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी घसरून 22,200.55 च्या पातळीवर बंद झाला. तर, Sensex हा दुसरा महत्वाचा निर्देशांक 118 अंकांनी म्हणजेच 0.16 टक्क्यांनी घसरून 72,987.03 च्या पातळीवर बंद झाला.
कसा होता आजचा बाजारी दिवस? (Share Market)
आज बाजारात झालेल्या या घसरणीमध्ये HDFC Bank, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स आणि सन फार्मा यांच्यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता. दुसरीकडे, Nifty Midcap 100 हा निर्देशांक 483 गुणांनी म्हणजेच 0.96 अंकांनी वाढून 50,707.75 च्या पातळीवर बंद झाला मात्र, Nifty Bank हा बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक 172 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांनी घसरून 47,687.45 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या घसरणीमध्ये FMCG आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आणि यामुळेच निर्देशांक खाली आले. मात्र, Smallcap आणि Midcap कंपन्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजार बऱ्यापैकी घसरतोय आणि यावर अनेक विश्लेषक त्यांची मतं व्यक्त करीत आहेत. येणाऱ्या काळात भारतीय शेअर बाजाराची काय स्थिती असेल यावर काहींना वाटते की येत्या काही दिवसांत बाजारात स्थिरता येईल, मात्र काहींच्या मते बाजारात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे(Share Market), म्हणूनच बाजारात गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्यावा.