Share Market Holiday: आज, म्हणजेच बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व कामकाज बंद असतील कारण, आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीरामांचा जन्मतोत्सव. मुंबई शेअर बाजार (BSE) च्या वेबसाइटनुसार आज शेअर्स, त्यांचे Derivatives आणि सिक्युरिटीज लेंडिंग & बॉरोइंग (SLB) बाबत सर्व व्यवहार बंद राहणार आहे. एवढंच नाही तर आजच्या दिवशी चलन (Currency), वस्तू (Commodity) आणि इलेक्ट्रॉनिक सोनेच्या रोखे (Electronic Gold Receipts) यांचे व्यवहारही थांबवण्यात आले आहेत.
काल कसा होता बाजारी दिवस? (Share Market Holiday)
काल शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि महत्वाचं म्हणजे ही घसरण सलग तिसऱ्या दिवशी झाली होती. टेक्नॉलॉजी कंपन्या आणि सरकारी मालकीच्या बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने हा बाजारावर असा विपरीत परिणाम झाला. मुख्य निर्देशांक असलेल्या Niftyमध्ये तब्बल 125 गुणांची घसरण होऊन तो 22,148 च्या पातळीवर बंद झाला. तर 30 प्रमुख कंपन्यांचा समावेश असलेला BSE Sensex 456 गुणांनी खाली येऊन 72,944 च्या पातळीवर बंद झाला.
Midcap आणि Smallcapच्या कंपन्यांच्या बाबतीत मात्र मिश्रित चित्र पाहायला मिळालं. Nifty Midcap 100 मध्ये 0.09 टक्क्यांची घसरण झाली तर Nifty Smallcap 100 मध्ये 0.75 टक्क्यांची इतकी वाढ झाली होती. Niftyच्या 16 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 8 निर्देशकांनी घसरणीचा सामाना केला(Share Market Holiday). Nifty IT आणि Nifty PSU bank हे निर्देशांक सर्वाधिक घसरले. या निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 2.58 टक्के आणि 1.27 टक्क्यांची घसरण झाली तर याच्या उलट, Nifty Pharma आणि Nifty Oil & Gas मध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.