Share Market Crash: 5 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण; परिणामी गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Crash: आज सकाळी शेअर बाजारात जोरदार तेजी होती, पण दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाली आणि बाजाराला वेगळीच कलाटणी मिळाली. दिवसाच्या शेवटी Sensex 732 गुणांनी घसरून 73,878 इतक्या पातळीवर बंद झाला तर Nifty 172 गुणांनी घसरून 22,475 इतक्या पातळीवर बंद झाला.

घसरणीमागे कारण काय? (Share Market Crash)

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या वेळी व्याजदर कमी केली जाण्याची शक्यता असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता कायम आहे, यामुळे परदेशी गुंतवणुकदार आणि भारतीय संस्थात्मक गुंतवणुकदारांनी शेअर्स विकले गेल्याने बाजार खाली आला. त्याचबरोबर अमेरिकेच्या NFP चा डेटा आज येणार असल्याची शंका होती आणि Sensex चा F&O करार संपण्याच्या दिवशी विक्रीचा जोर वाढल्यामुळे हे सर्व घटक आजच्या घसरणीला कारणीभूत ठरू शकतात.


कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण?

CEAT Tyers  – 4.2 %
ज्योती लॅब्स – 3.6%
ब्लू स्टार – 3%
रिलायन्स इंडस्ट्रीज – 3.5%
MRF – 3%
टाटा ट्रेंट – 3%

शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवण करणाऱ्या गुंतवणुकदारांनी आज 4 लाख कोटी रुपये गमावले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि MRF सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवण करणाऱ्या गुंतवणुकदारांना सर्वाधिक नुकसान झाले आहे.

बजाज फायनान्सचा शेअर चढला

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये दिवसाच्या एका टप्प्यावर 8 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. रिझर्व्ह बँकेने कंपनीवरील काही निर्बंध हटवल्यानंतर ही वाढ झाली होती (Share Market Crash), शेवटी बजाज फायनान्सचा शेअर 0.75 टक्क्यांच्या वाढीसह 6932.80 रुपयांवर बंद झाला.

Leave a Comment