Share Market Closing: SmallCap आणि MidCapने मारली बाजी; “असा” होता बाजारी दिवस

Share Market Closing: भारतीय शेअर बाजारात आज तिसऱ्या दिवशी सलग तेजी पाहायला मिळाली. यामध्ये Midcap आणि Smallcap कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. FMCG, Consumer Durable आणि IT क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणुकदारांकडून खरेदीची मोठी लाट पाहायला मिळाली.

कसा होता आजचा बाजरी दिवस? (Share Market Closing)

आजच्या बाजारी दिवसात BSE Sensex 90 गुणांनी वधारून 73,738 च्या उच्चांकावर बंद झाला, तर Nifty 50 देखील 32 गुणांनी वधारून 22,368 वर बंद झाला. आजच्या कारभारा दरम्यान BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य पुन्हा एकदा 400 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते, त्यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती 1.83 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.

आज Midcap आणि Smallcap कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली. Nifty Midacp निर्देशांक 518 गुणांनी तर Smallcap निर्देशांक 203 गुणांनी वधारला. त्याचबरोबर बँकिंग,IT, वाहन, FMCG, Real Estate, मीडिया आणि Consumer Durable या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही खरेदीचा सपाट पाहायला मिळाला.

मात्र, फार्मा, हेल्थकेअर, तेल आणि वायू, ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली(Share Market Closing). आज Sensex मधील 30 पैकी 18 कंपन्यांचे शेअर्स वाढून बंद झाले तर उर्वरित 12 कंपन्यांचे शेअर्स घसरून बंद झाले. Nifty मध्ये देखील 50 पैकी 30 कंपन्यांचे शेअर्स वाढले तर 20 कंपन्यांचे शेअर्स घसरले होते.

Leave a Comment