Share Investment: SBIच्या शेअर्सची कमाल; 500 रुपयांनी घेतली लांब उडी

Share Investment: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक श्रीमंत तसेच माध्यमवर्गीय ग्राहक आज शेअर बाजारात गुंतवणूक करताना दिसतात. शेअर बाजार हा कधी चढणारा आणि कधी उतरणारा प्रकार आहे आणि आज शेअर बाजाराकडून मिळाली एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजची बातमी सांगतेय की छत्तीसगढ येथील डॉ. तन्मय मोतीवाला यांना भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शेअरमधून अनपेक्षित लाभ मिळाला आहे. विचार करा वर्ष 1994 मध्ये डॉ. मोतीवाला यांच्या अजोबांनी 500 रुपये गुंतवून SBI चे शेअर खरेदी केले होते आणि आज 30 वर्षानंतर, त्या शेअरची किंमत 750 पट वाढून ती गुंतवणूक 3 लाख 75 हजार रुपये झाली आहे.

कोण आहेत डॉ. तन्मय? (Share Investment)

डॉ. तन्मय मोतीवाला हे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या अजोबांनी 1994 मध्ये भारतीय स्टेट बँकेचे 500 रुपयांचे शेअर विकत घेतले होते आणि अलीकडेच डॉ. मोतीवालांना त्या शेअरचे प्रमाणपत्र सापडले. जेव्हा त्यांनी त्या शेअरची आजची किंमत पाहिली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्यांना त्या गुंतवणुकीवर 750 पट परतावा मिळाला होता.

डॉ. मोतीवालांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आणि त्यांचं ट्विट काही क्षणातच व्हायरल झालं आहे. डॉक्टर म्हणतात, “SBIचे हे Physical शेअर मी डिमॅटमध्ये परिवर्तित केले, मात्र ही प्रक्रिया खूप लांब आणि अवघड आहे. त्यासाठी सल्लागाराची मदत घेणं गरजेचं आहे (Share Investment).”डॉ. मोतीवालांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांचं कौतुक केलं आहे.

Leave a Comment