SEBI Guidelines: शेअर बाजारात पसरणाऱ्या अफवांमुळे कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीवर विपरीत परिणाम दिसून येतो आणि यालाच रोखण्यासाठी भारतीय Securities and Exchange Board of India (SEBI) ने नुकतेच नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार, आता शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्यांना त्यांच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अफवांची 24 तासांच्या आत खातरजमा करावी लागणार आहे.
SEBI चे नवीन नियम:(SEBI Guidelines)
पहिल्या टप्प्यात हा नियम 1 जून 2024 पासून देशातील Top-100 कंपन्यांसाठी लागू होईल, तर डिसेंबर 2024 पासून पुढच्या 150 कंपन्यांसाठी हा नियम प्रभावी होईल. SEBI ने बाजारातल्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार, सूचीबद्ध कंपन्यांना SEBI द्वारे जारी केलेल्या ‘भारतीय मानकांचे’ पालन करणे बंधनकारक असेल आणि ही मानके अफवांचे सत्यापन आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतील. Stock Exchange आणि तीन व्यापार संस्था (असोचाम, फिक्की आणि CII) यांच्या वेबसाइटवर या मानक टिप्पण्या प्रकाशित केल्या जातील.
शेअर बाजारात अफवांमुळे अनेकदा कंपन्यांच्या किमतीत चढउतार होतो आणि याचा फायदा घेऊन काही गुंतवणदारांकडून फसवणूक देखील केली जाते(SEBI Guidelines). या नवीन नियमांमुळे अशा अफवांवर त्वरित लगाम बसणार आहे. त्याचबरोबर अफवांमुळे होणारा शेअरच्या किमतीतील चढउतार रोखून गुंतवणदारांचे हित जपले जाणार आहे.