Reliance Q4 Results: नफा घटला पण गुंतवणदारांना दिलासा; ‘असा’ आहे तिमाही निकाल

Reliance Q4 Results: गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची सर्वजणं आतुरतेने वाट पाहत होते तो तिमाही निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आपल्या देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आज तिमाही निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.80 टक्के घटून 18,951 कोटी रुपये इतका झाला आहे.

रिलायन्सचा तिमाही निकाल: (Reliance Q4 Results)

कंपनीने सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या तिमाही विक्रीत (revenue from operations) गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे, एकूण आकडे 11.3 टक्के वाढून 2,40,715 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तसेच कंपनीच्या व्याजत, करात आणि EBITDA मध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळाली. कंपनीचा EBITDA 14.3 टक्के वाढून 47,150 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. निव्वळ कर्जाचा आकडा मार्च तिमाहीमध्ये 1,16,281 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय, जो गेल्या तिमाहीचे तुलनेत तिमाहीच्या 1,19,372 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, मजबूत व्यवसायांमुळे कंपनीचा EBITDA चांगला राहीला. इतर कंपन्यांबद्दल बोलायचं झाल्यास रिलायन्स Jio ची ग्राहकसंख्या वाढत राहिल्याने त्यांचा EBITDA 12.5 टक्के वाढला, तर रिलायन्स रिटेलचा EBITDA 18.5 टक्क्यांनी वाढला आहे. तेल आणि वायू क्षेत्रातील देखील 47.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनी जाहीर करणार लाभांश:

आजचा रिलायन्सचा तिमाही निकाल शेअर धारकांसाठी खास ठरला कारण याच दरम्यान कंपनीने शेअरधारकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे (Reliance Q4 Results). या नवीन बातमीनुसार रिलायन्सच्या मंडळाने वित्त वर्ष 2024 साठी प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लवकरच याबद्दलची माहिती समोर येईल.

Leave a Comment