Reliance Jio Q4 Results: आजचा दिवस बाजाराबद्दल माहिती ठेवणाऱ्यांसाठी खास आहे, कारण आज मुकेश अंबानी त्यांच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार होते. ठरल्याप्रमाणे आज मुकेश अंबानींच्या Reliance Industries Limited (RIL) च्या दूरसंचार कंपनीने म्हणजेच Reliance Jio ने आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि समोर आलेल्या आकड्यांनुसार कंपनीच्या नफ्यामध्ये 13.17 टक्क्यांची वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही वाढ ग्राहकांच्या सततच्या वाढत्या संख्येमुळे शक्य झाली.
असा आहे कंपनीचा निकाल:(Reliance Jio Q4 Results)
Jio ने सादर केलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 4,716 कोटी रुपयांवरून वाढून 5,337 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर, कंपनीची वार्षिक कार्यापट्टीही (revenue from operations) 11 टक्क्यांनी वाढून 25,959 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, त्याचवेळी कंपनीचा एकूण खर्च देखील 10.2 टाक्यांनी वाढलाय. 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीची एकूण मालमत्ता 4,45,772 कोटी रुपयांवरून वाढून 4,87,405 कोटी रुपये एवढी झाली आहे. तसेच, निव्वळ नफा देखील गेल्या वर्षाच्या 17.1 टक्क्यांच्या तुलनेत वाढून यंदाच्या चौथ्या तिमाहीत 17.5 टक्क्यांवर जाणून पोहोचला आहे.
सध्या Jio 5G नेटवर्कची उभारणी करत असून त्यांचं अस्तित्वात असलेलं Wireless and Wireline Network क्षमता वाढवण्याचे कामही सुरू आहे, अशी माहिती कंपनीने निकालदरम्यान सर्वांसमोर ठेवली (Reliance Jio Q4 Results).
शिवाय दूरसंचार क्षेत्रातील कामगिरी मोजण्याचा एक महत्वाचा निकष असतो तो म्हणजे Average Revenue Per User आणि ग्राहकांची संख्या. मात्र ही माहिती अद्याप बाकी राहिलेली आहे आणि सदर माहिती कंपनी नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालांबरोबर जाहीर करेल, असंही कंपनीकडून याचदरम्यान स्पष्ट करण्यात आलंय.