RBI Action on Kotak Mahindra: खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेबाबत आज एक मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) कोटक महिंद्राला Online आणि Mobile Banking App द्वारे नवीन खातेधारक जोडण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही RBI ने बंदी घातली आहे.
विद्यमान ग्राहकांवर बंदीचा परिणाम नाही:
रिझर्व्ह बँकेने 1949 च्या Banking Regulation Act 35A अंतर्गत मोठी कारवाई करत कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ नवीन खातेधारक जोडण्यावर बंदी घातली आहे. मात्र, विद्यमान ग्राहकांना बँकेकडून सर्व प्रकारच्या सेवा पूर्ववत सुरळीतपणे मिळत राहतील, यामध्ये विद्यमान क्रेडिट कार्डधारक देखील समाविष्ट असून त्यांना मिळत असलेल्या सुविधा पूर्ववत मिळत राहतील.
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात IT Risk Management Framework नसल्याने बँकेच्या Core Banking System आणि Online आणि Digital Banking Channels वर अनेकदा अडचणी आल्या आणि यामुळे बँकेच्या ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले(RBI Action on Kotak Mahindra). कोटक महिंद्रा बँकच्या IT इन्व्हेंटरी आणि डाटा सुरक्षेच्या व्यवस्थानामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, असेही RBI ने म्हटले.
दोन वर्षात दुरुस्ती नाही: (RBI Action on Kotak Mahindra)
रिझर्व्ह बँक म्हणते की, दोन वर्षात बँकेने त्यांच्या संगणयंत्राच्या उपकरणांशी संबंधित समस्या, software updates किंवा सिस्टममध्ये प्रवेश यांशी संबंधित समस्या सोडवल्या नाहीत, तसेच data security ची व्यवस्थाही केली नाही. अशाप्रकारे नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच रिझर्व्ह बँकेने ऑडिट झाल्यानंतर बंदीविषयी पुनःपरीक्षणाचा निर्णय घेतला जाईल असेही स्पष्ट केले आहे.