RBI Action against Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँकेने (RBI) खासगी क्षेत्रातील एक महत्वाची बँक म्हणजेच कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. RBI ने तात्काळ कोटक महिंद्रा बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली आहे, त्यामुळे आता बँकेला कोणत्याही नवीन ग्राहकांसाठी नवीन क्रेडिट कार्ड जारी करता येणार नाही. यासोबतच Online आणि Mobile Banking Channelच्या माध्यमातून नवीन ग्राहकही जोडू शकणार नाही.
या निर्णयाचा जुन्या ग्राहकांवर परिणाम: (RBI Action against Kotak Mahindra Bank)
वर्ष 2022 आणि 2023 च्या दरम्यान बँकेच्या IT पायाभूत सुविधांचे नूतनीकरण न केल्यामुळे बँकेला दीर्घकाळापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. याबाबत RBI ने आधीच बँकेला ताकीद दिली होती, परंतु बँकेने ही कमतरता दूर करण्याची कोणतीही तयारी दाखवली नाही आणि परिणामी आता रिझर्व्ह बँकेने सदर कारवाई केली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, IT शी संबंधित या त्रुटींमुळे ग्राहकांना त्रास होत असूनही देशातील मोठ्या प्रमाणात ग्राहक सध्या कोटक महिंद्रा बँकेच्या सेवांचा लाभ घेत आहेत. हा आदेश जरी नवीन ग्राहकांशी संबंधित असला तरीही, आता RBI च्या या कारवाईचा जुन्या ग्राहकांवर काय परिणाम होईल असा प्रश्न उपस्थित राहतो(RBI Action against Kotak Mahindra Bank).
तुम्ही देखील कोटक महिंद्राचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, त्यामुळे जे ग्राहक आधीपासूनच बँकेचे खातेदार आहेत त्यांना मात्र पूर्वीप्रमाणे सर्व सुविधा मिळत राहतील. सर्वोच्य बँकच्या आदेशानुसार बँकेच्या विद्यमान क्रेडिट कार्डधारकांना पूर्वीप्रमाणेच सुविधा मिळेल. सध्या कोटक महिंद्रा बँकेचे 4.12 कोटी खातेदार आहेत आणि त्यापैकी 49 लाखांहून अधिक ग्राहकांची क्रेडिट कार्ड सक्रिय आहेत, तर 28 लाखांहून अधिक ग्राहकांची डेबिट कार्ड सक्रिय आहेत.