PM Modi Net Worth: एवढी आहे पंतप्रधान मोदींची संपत्ती; वाचून चकीत व्हाल!!

PM Modi Net Worth: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारीच्या नामांकनासाठी सलग तिसऱ्यावेळा वाराणसीतून नाव नोंदणी केली. बुधवारी, पंतप्रधान मोदींनी निवडणूकीत उमेदवार म्हणून नावनोंदणी करताना त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे समाविष्ट केली. निवडणूक आयोगाला पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 3,02,06,889 च्या आसपास आहे.

किती आहे मोदींची एकूण संपत्ती?(PM Modi Net Worth)

निवडणूक उमेदवार म्हणून अर्ज करताना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संपत्तीचा तपशील दिला. मोदींच्या म्हणण्यानुसार 31 मार्च, 2024 पर्यंत त्यांनी 52,920 रुपये नकद ठेवले होते, त्यातून 28,000 रुपये निवडणूकीत खर्चासाठी वापरण्यात आले. सर्व ठेवणींमधल्या रकमेबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्याजवळ 2.85 कोटी रक्कम आहे, यामधले 73,304 रुपये SBI च्या गांधीनगर शाखेत ठेवले आहेत आणि 7,000 रुपये वाराणसीतील SBI च्या खात्यात ठेवले आहेत.

पंतप्रधान मोदींची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची (NSC ठेवण) रक्कम 9,12,000 आहे. त्यांची इतर संपत्तींमध्ये चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचे मूल्य 2,67,750 लाखच्या जवळपास जाते(PM Modi Net Worth). पंतप्रधान मोदींजवळ कोणतेही अचल संपत्ती नाही तसेच त्यांच्याजवळ कोणतेही घर, जमिनी किंवा कोणतीही गाडी नाही.

1 thought on “PM Modi Net Worth: एवढी आहे पंतप्रधान मोदींची संपत्ती; वाचून चकीत व्हाल!!”

Leave a Comment