Personal Loan: वयक्तिक कर्ज थेट दुसऱ्याच्या नावी करता येते का?

Personal Loan: तुमच्या गरजेसाठी तुम्ही एखाद्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेता. पण काही कारणास्तव तुम्हाला हे कर्ज दुसऱ्याच्या नावावर करायचे असले तर ते शक्य आहे का? तर याचे सरळ उत्तर आहे “नाही”, कारण ही कर्जे तुमची क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि पूर्वीच्या आर्थिक व्यवहाराला अनुसरून दिली जातात. त्यामुळे अशाप्रकारचे कर्ज मंजूर करताना बँक फक्त तुमच्याच पात्रतेचा विचार करते.

वैयक्तिक कर्ज थेट दुसऱ्याच्या नावावर करता येत नसण्याची कारणे: (Personal Loan)

वैयक्तिक कर्जे ही सहसा हस्तांतरित करता येत नाही, कारण हा करार तुमच्या आणि बँकेमधील आणि केवळ तुमच्यासाठीच तयार केलेला असतो. कर्ज मंजूर करण्याआधी बँका तुमची क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्नाची निश्चितता यांची बारकाईने तपासणी करतात, त्यामुळे नवीन कर्जाला पात्र ठरण्यासाठी त्या नवीन व्यक्तीला स्वतंत्रपणे क्रेडिट तपासणी आणि उत्पन्न पडताळणीची प्रक्रिया पार पाडावी लागेल.


काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही बँका किंवा NBFC कर्ज हस्तांतरणाची सुविधा देतात. जेव्हा मूळ कर्जदार कर्ज परतफेडीची जबाबदारी पार पाडू शकत नाही तेव्हाच या सवलतीचा वापर केला जाऊ शकतो, कारण अशावेळी बँकेला अजूनही कर्ज फेडणारा पर्यायी व्यक्ती मिळतो आणि कर्जाची परतफेड होते. जर तुमच्याकडे वैयक्तिक कर्ज असेल तर कर्ज हस्तांतरण तुमच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी, आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, मात्र कर्ज हस्तांतरणाचे परिणाम लक्ष्यात घेतले पाहिजेत.

वयक्तिक कर्जामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली असल्यास निराश होण्याची गरज नाही. याला देखील काही पर्यायी मार्ग आहेत.

१) एखादा विश्वासू मित्र किंवा नातेवाईक तुमच्या नवीन वैयक्तिक कर्जासाठी सह-हस्ताक्षरी करून सहकार्य करू शकतो. मात्र यासाठी त्यांची credit history चांगली असेल तर कमी व्याजदरावर कर्ज मिळण्यास मदत होते.

२) जर तुमच्यावर वैयक्तिक कर्जासह इतर अनेक कर्जे असतील तर कर्ज समेकनाचा विचार करा(Personal Loan). यात तुमची सर्व कर्जे एकाच कर्जामध्ये विलीन केली जातात, यामुळे कदाचित कमी व्याजदर मिळू शकतो आणि परतफेडीची प्रक्रिया सोपी होते.

३) कर्ज परतफेड करणे कठीण होत असल्यास, तुमच्या कर्जदात्यासोबत कर्ज निराकरणाबाबत चर्चा करा. यामध्ये तुम्ही कर्ज रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन कर्ज पूर्णपणे बंद करू शकता. मात्र, कर्ज निराकरणामुळे तुमच्या credit score वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

४) जर तुमच्या वैयक्तिक कर्जासाठी काही गहाण असलेली मालमत्ता असेल, तर तुम्ही मालमत्ता विकून कर्ज फेडू शकता पण यासाठी कर्जदाराकडून मंजुरी घ्यावी लागते, तसेच कर्ज रक्कम आणि मालमत्तेच्या किमतीनुसार तुम्हाला तोटाही मिळू शकतो.

Leave a Comment