Paytm Q4 Results: Paytmचे निकाल जाहीर; कंपनीला तोटा, शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण

Paytm Q4 Results: आज बाजारात जर का एखादी बातमी जर का सर्वात महत्वाची असेल तर ती आहे Paytm या कंपनीचे त्रैमासिक निकाल होय. गेल्या आर्थिक कंपनीने अनेक आर्थिक चढ उतार पहिले आहेत आणि म्हणूनच या कंपनीचे निकाल कसे असतील याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. समोर आलेल्या माहितीनुसार Paytm च्या त्रैमासिक निकालांमध्ये मिश्र संकेत पाहायला मिळाले आहेत आणि गुंतवणुकदारांसाठी ही थोडी चिंताजनक बातमी ठरू शकते.

UPI आणि बँकेवरील बंदीचा फटका:

Paytm च्या त्रैमासिक निकालांवर UPI व्यवहारांमध्ये झालेली घट आणि Paytm Payments Bank वर रिझर्व्ह बँकेने लादलेली बंदी यांचा विपरीत परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत यंदा कंपनीची एकूण उलाढाल 3 टक्क्यांनी घटून 2,267 कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ही उलाढाल 2,334 कोटी रुपये होती.

नफ्यात घट: (Paytm Q4 Results)

नफ्याच्या बाबतीतही कंपनीला काही प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 234 कोटी असलेला कंपनीचा EBITDA यंदा घटून फक्त 103 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत वार्षिक आधारावर Paytm ची उलाढाल 7 टक्क्यांनी वाढून 1,568 कोटी झाली असली तरी तिमाही आधारावर (QoQ) मात्र ही उलाढाल 9 टक्क्यांनी घसरली आहे.

शेअर बाजारावर परिणाम:

Paytm च्या या निकालांचा शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे. बुधवारी शेअर बाजार उघडताच Paytm च्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण झाली (Paytm Q4 Results). या घसरणीमुळे कंपनीच्या बाजार भांडवलाची (Market Capitalization) किंमतही 22,040 कोटी रुपये झाली आहे.

Leave a Comment