Patanjali Foods: पतंजलि फूड्सच्या मंडळाने शुक्रवारी 26 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पतंजलि आयुर्वेदकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. या प्रस्तावानुसार, पतंजलि आयुर्वेदचा अन्नधान्येतर व्यवसाय पतंजलि फूड्सला विकण्यात येणार आहे. पतंजलि फूड्सने हा व्यवसाय विकत घेण्याबाबत सकारात्मक संकेत दिले असून, हा करार कंपनीच्या फायद्याचा ठरेल कि नाही याची खात्री करण्यासाठी आर्थिक मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय हा करार पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर व व्यावसायिक पावले उचलण्याचे अधिकारही कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पतंजली फूडशी हातमिळवणी: (Patanjali Foods)
पतंजलि आयुर्वेदाचा अन्नधान्येतर व्यवसाय विकत घेतल्याने पतंजलि फूड्सच्या उत्पादनांच्या प्रकारात वाढ होईल आणि कंपनीच्या उत्पन्नात आणि EBITDA मध्ये सुधार होईल अशी अपेक्षा आहे. यापूर्वीही पतंजलि फूड्सने आपले उत्पादन पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी Patanjali Natural Biscuit Pvt. Ltd कडून 60.03 कोटी रुपयांना बिस्किट व्यवसाय, 3.50 कोटी रुपयांना Noodles आणि Breakfast Cerealsचा व्यवसाय आणि 690 कोटी रुपयांना अन्नधान्य व्यवसाय मे 2022 मध्ये विकत घेतला होता.
याच आठवड्याच्या सुरुवातीला, पतंजलि फूड्सने(Patanjali Foods) भारतात Contemporary Agro आणि कृषी फार्मिंग या दोन उपकंपन्यांची स्थापना केली. या दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, शेती क्षेत्रात इतर मानवीय संसाधनांचा वापर करणे, सर्व प्रकारच्या शेतीमध्ये सुधारणा करणे आणि शेती, कृषी आणि रोपवाटिका क्षेत्रात नावीन्य आणणे हे आहे.