Patanjali Case: आयुर्वेदिक औषधांच्या जाहिरातींमध्ये काही विशिष्ठ रोगांवर उपचार करण्याची जाहिरात केल्याप्रकरणी पतंजली विरोधात सर्वोच्य न्यायालयात खटला सुरु झाला. आता या प्रकरणात वरिष्ठ न्यायालयाने तीव्र दखल घेतली असून पतंजलीला माफी मागण्यास भाग पाडलं आहे. जाहिरातींमध्ये केल्या जाणाऱ्या अतिशयोक्ती आणि चुकीच्या माहितीमुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी न्यायालय कठोर भूमिका घेत आहे.
न्यायालयाने पतंजलीला सुनावलं: (Patanjali Case)
मागील सुनावणीत, न्यायालयाने पतंजलीच्या वकिलांनी सादर केलेल्या माफीनाम्यावर एक आठवड्याची मुभा दिली होती. मात्र, यावेळी न्यायाधीशांनी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. “आम्ही मागील सुनावणीत काय म्हटलं ते तुम्हाला माहीत नव्हतं असे नाटक करू नका,” असे कणखर वक्तव्य न्यायालयाने बालकृष्णांचाय विरोधात केले.
या प्रकरणात उत्तराखंड औषध परवाना प्राधिकरण (DPA) यांच्यावरही न्यायालयाने टीका केली. चुकीच्या माहिती देणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची जबाबदारी असतानाही DPA यांनी या प्रकरणात ढिलाई दाखवली असे न्यायालयाचे म्हणणे आहे. आता याबद्दलची पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार असून यावेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना स्वतः न्यायालयात हजर राहण्याची सक्ती करण्यात आलीये(Patanjali Case) आणि या प्रकरणाचा निकाल काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.