Nirmala Sitaraman: सरकारला Sleeping Partner म्हणत केलेल्या ‘त्या’ प्रश्नावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात एका कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र याच दरम्यान विचारण्यात आलेल्या एका भलत्याच प्रश्नामुळे त्या आणि त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहेत. अनेकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेलं उत्तर रुचलं नाही आणि परिणामी त्यांना टीकांचा सामना करावा लागला होता. काय आहे हा एकूण प्रकार आज जाणून घेऊया…

अर्थमंत्र्यांवर टीका का?(Nirmala Sitaraman)

काल स्टॉक बाजाराच्या संधर्भात झालेल्या एका चर्चेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एका ब्रोकरने थोडा कठीण प्रश्न विचारला. त्याच्या म्हणण्यानुसार सामान्य माणसाने केलेल्या गुंतवणुकीवर सरकार जास्ती फायदा मिळवते. GST, स्टॅम्प ड्युटी, Security Transaction Stamp यांसारख्या अनेक टॅक्सद्वारे सरकार लाखो रुपयांची कमाई करीत आहे. या संधर्भात सरकारला स्लीपिंग पार्टनर म्हणत त्यांने प्रश्नचिन्ह उभे केले.

तो पुढे म्हणाला कि सध्या तो मुंबई शहरात घर विकत घेत आहे, ज्यावर Stamp Duty आणि GST सारखा कर बसवला जातोय. मात्र आता घर खरेदी करताना रोख रक्कम स्वीकारली जात नाही, फक्त चेकनेच देयक द्यावे लागेते. परिणामी मर्यादित संसाधने असलेल्या लोकांना घर खरेदी करण्यास मदत करण्यासाठी सरकार काय करत आहे हे या व्यक्तीला जाणून घ्यायचे होते.

यावर काय म्हणाल्या अर्थमंत्री?

या प्रश्नावर थेट काही उत्तर न देता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हसत हा प्रश्न नजरेआड करण्याचं प्रयत्न केला. त्या म्हणाल्या की स्लीपिंग पार्टनर इथे बसून या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. मात्र पुढे वाढलेल्या करामुळे सामान्य लोकांवर परिणाम होतोय आणि म्हणूनच स्टॉक बाजार आणि SEBI ने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

स्लीपिंग पार्टनर म्हणजे कोण?

स्लीपिंग पार्टनर किंवा कधीकधी गुप्त भागीदार हा असा व्यक्ती असतो जो एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवतो पण दैनंदिन कारभारात किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होत नाही(Nirmala Sitaraman). ते मूलत: आर्थिक पाठबळ देणारे असतात जे पडद्याआड राहतात.

Leave a Comment