Nirmala Sitaraman: Future and Option मधील गुंतवणुकीवर अर्थमंत्र्यांनी दिलाय ‘हा’ सल्ला

Nirmala Sitaraman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील रिटेल गुंतवणूकदारांना एक महत्वाची माहिती दिली. तुम्ही देखील जर का Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. अर्थमंत्र्यांनी आज Future & Option मध्ये गुंतवणूक करण्याचे काही संबंधित तोटे सांगितले जे तुम्ही नक्कीच विचारात घेतले पाहिजेत, त्यामुळे या संपूर्ण विषयी अर्थमंत्री काय म्हणाल्यात हे आज जाणून घेऊया…

काय म्हणतायत अर्थमंत्री? (Nirmala Sitaraman)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार Future & Option मध्ये गुंतवणूक केल्याने कदाचित येणाऱ्या काळात बचतीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात येऊ घातलेली तेजी ही गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगला पर्याय वाटत नाही. SEBI कडून करण्यात आलेल्या एका अभ्यासाचे उदाहरण देत त्यांनी Future & Option मध्ये 10 रिटेल गुंतवणूकदारांपैकी 9 जणांना Future & Option मधून नुकसानच सोसावे लागले असल्याची माहिती दिली आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी शेअर बाजाराने आता SEBI सोबत हातमिळवणी करत नियम आणखीन कठोर करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. शेअर बाजारावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतोय आणि म्हणूनच NSE आणि BSE ने सर्व प्रकारचे नियम आणखीन कठोर करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं त्या म्हणाल्या.

Future & Option म्हणजे काय?

शेअर बाजारात फक्त शेअर्सचं ट्रेडिंग होत नाही तर त्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या आर्थिक उत्पादनांचीही खरेदी-विक्री केली जाते. त्यापैकीच दोन महत्वाची उत्पादने म्हणजे Future & Option(Nirmala Sitaraman).

Future हे करारासारखे असते. या करारामध्ये तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला, आत्ताच ठरवलेल्या किंमतीवर एखादी मालमत्ता (Stock, Commodity etc.) खरेदी करण्याचा किंवा विक्री करण्याचा करार करता. उदाहरणार्थ, रिलायन्सच्या (Reliance) एका शेअरची किंमत आज 1000 रुपये आहे. तुम्हाला वाटतंय पुढच्या महिन्यात किंमत वाढेल. म्हणून तुम्ही Future Contract मध्ये पुढच्या महिन्याच्या शेअरची किंमत 1100 अशी ठरवून खरेदीचा करार करता आणि पुढच्या महिन्यात किंमत खरंच 1100 झाली तर तुम्हाला फायदा मिळतो पण किंमत कमी झाली तर मात्र तोटा सहन करावा लागतो.

Option हा देखील एक प्रकारचा करार आहे पण Future पेक्षा काहीसा वेगळा म्हणावा लागेल. यामध्ये तुम्हाला विशिष्ट किंमतीवर मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा अधिकार मिळतो पण यावर कोणतेही बंधन नसते. गुंतवणूक करताना इथे दोन प्रकारचे पर्याय दिले जातात, Call Option आणि Put Option.

Leave a Comment