New Car Buying Tips: नवीन गाडी घेताना पैसे वाचवा; ‘या’ गोष्टी लक्ष्यात ठेवा

New Car Buying Tips: आपल्यापैकी अनेकांना नवीन गाडी घेण्याची इच्छा असतेच, स्वतःची एखादी गाडी वेळेप्रसंगी हाताशी असणं ही काळाची गरज आहे. मात्र आपण घेत असलेली गाडी ही आपल्याला परवडणारी आहे का? यामुळे आपल्या खिश्यावर काही परिणाम होणार नाही ना या महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. काहींना पैशाची अडचण नसते पण बहुतेकांना गाडी घेताना बजेट विचारात घ्यावं लागतं, त्यामुळे गाडी विकत घेताना लक्ष्यात राहाव्यात अश्या काही गोष्टी आज तपासून पाहुयात…

  • चांगली चौकशी कर : गाडी घेण्याआधी विकत घेत असलेल्या गाडीची संपूर्ण चौकशी करा. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांच्या किमती, features आणि लोकांचे reviews ऑनलाईन उपलब्ध करवून देतात, त्यामुळे कोणती गाडी विकत घ्यावी हा निर्णाय पक्का करण्याआधी ही माहिती तपासून पहा. गाडी किती मायलेज देते, तिच्या देखभालीचा खर्च किती असेल, आणि insurance किती लागणार हेही पाहा.
  • बजेट ठरवा: तुमच्या खिश्याला गाडीसाठी खर्च करणं शक्य आहे का ते अगोदर ठरवा. फक्त गाडीची किंमत नाही तर loan चं व्याज, insurance, पेट्रोलची किंमत तपासून घ्या. तुमच्या गरजेनुसार गाडी निवडा आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारी गाडी घ्या.
  • लोनचा पर्याय तपासा : गाडी पैसे देऊन घेणं कधीही चांगलं पण लोन घेतल्याने तुम्ही थोडा थोडा पैसा जमा करू शकता. वेगवेगळ्या बँका, credit unions आणि car finance कंपन्यांचे व्याज दर आणि terms तपासून घ्या. कमी व्याजात लोन मिळवण्यासाठी सवलत योजनांचा फायदा घ्या.
  • विमा: गाडीचा विमा घेताना वेगवेगळ्या कंपन्यांचे दर आणि plans तपासून पहा आणि तुमच्या गरजेनुसार विम्याची निवड करा(New Car Buying Tips).
  • सरकारी मदत: इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांवर सरकारकडून काही सबसिडी आणि कर सूट दिली जाते, या प्रकारची सविस्तर माहिती घ्या कारण यामुळे गाडी खरेदी करताना तुमचे पैसे वाचायला मदत होईल.

Leave a Comment