Nestle Case: बाळाला Cerelac देताय? Nestle पासून सावधान!!

Nestle Case: आपल्या सर्वांना माहिती आहेच की, नेस्ले ही जगातील सर्वात मोठी खाद्यपदार्थांच्या बाबतीत वावरणारी कंपनी आहे. तुमच्यापैकी अनेकजणं या कंपनीचे ग्राहक देखील असाल आणि म्हणूनच ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरते, कारण या कंपनीवर सध्या एक गंभीर आरोप झाला आहे. Nestle काही देशांमध्ये विक्री करत असलेल्या बाळाच्या पदार्थांत साखर भरते, तर युरोप आणि इंग्लंडमध्ये विक्री होणाऱ्या अशाच पदार्थांत मात्र साखर आढळून येत नाही. अचंबित झालात ना? चला तर पाहुयात नेमकं प्रकरण आहे तर काय?

Nestle ची चोरी उघडकीस? (Nestle Case)

स्वित्झर्लंडमधील Public Eye या तपास संस्थेने आणि International Baby Food Action Network – IBFAN या संघटनेने संयुक्तरित्या केलेल्या तपासातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या तपासात त्यांनी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या खंडातील नेस्लेच्या Cerelac पदार्थाचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करण्यात आली आणि या चाचणीतून धक्कादायक खुलासा झाला, या Cerelac मध्ये प्रत्येक डोसाला सरासरी 4 ग्रॅम साखर असल्याचे आढळून आले.

WHO दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्याही प्रकारची साखर देऊ नये, अशी शिफारस करते. पण नेस्ले या शिफारशीची बिल्कुल पर्वा न करता बाळाच्या आहारावर साखरेचा मारा करत आहे. केवळ Cerelac च नाही, तर Nestle च्या Nido या फॉलो-अप दूध पावडरीमध्येही काही देशांमध्ये साखर आढळून आली, तर काही देशांमध्ये साखरेचे प्रमाण दिसून आले नाही. या प्रकरणानंतर Nestle वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे नियम राबवत आहे का असा प्रश्न निर्माण झालाय.

Nestle चे असे आहे उत्तर:

Nestle ने आपल्यावर झालेल्या आरोपांचे समर्थन करताना असा दावा केला आहे की, त्यांची सर्व उत्पादने स्थानिक नियमावलींचे पालन करतात. पण आरोग्य तज्ज्ञांनी मात्र नेस्लेच्या या उत्तराचे समर्थन केले नाही (Nestle Case). याउलट त्यांनी Nestle च्या लहान मुलांना साखरेयुक्त पदार्थ विकण्याच्या पद्धतीवर जोरदार टीका केली आहे.

लहान मुलांना किती साखर द्यावी, हा काळजीचा विषय आहे कारण बाळांच्या आहारातील जास्त साखर ही लठ्ठपणा, दातांची झीज आणि इतर आरोग्य समस्यांचे प्रमुख कारण ठरते. आपल्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असते म्हणून, बाळाच्या आहाराबाबत कोणतीही उत्पादने वापरण्यापूर्वी त्यांची बारकाईने माहिती घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment