Mutual Fund: गुंतवणूक करायची आहे? पहा मागच्या 5 वर्षात चमकलेले Mutual Funds

Mutual Fund: ही बातमी भारतातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची ठरणार आहे, कारण गेल्या पाच वर्षांत Mutual Fund या क्षेत्राने गुंतवणूकदारांना दणक्यात परतावा देण्याची कामगिरी बजावली आहे. AMFI च्या माहितीनुसार, Mid Cap श्रेणीतील Top-10 सर्वोत्तम फंडांमध्ये Quant Mid Cap Fund पहिल्या क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ Oswal Midcap Fund आणि Mahindra Manulife Mid Cap Fund आहेत. चला तर मग जाऊन घेऊया गुंतवणुकीच्या बाजारात बोलबाला असणाऱ्या या म्युचुल फंड्सबद्दल..

दमदार कामगिरी बजावणारे Mutual Fund कोणते?

इतर आघाडीच्या फंडांमध्ये PGIM India Midcap Opportunities Fund, Edelweiss Mid Cap Fund आणि Baroda BNP Paribas Midcap Fund यांचा समावेश होतो. HDFC Mid-Cap Opportunities Fund, Kotak Emerging Equity Fund, SBI Magnum Midcap Fund आणि nvesco India Mid Cap Fund देखील या यादीत सामील झाले आहेत आणि या सर्वानी Mid Cap Stock मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक गुंतवणूकदारांसाठी हे फायदेशीर ठरेल आहेत. यामधल्या दहापैकी सात Funds नी त्यांच्या गुंतवणूकदारानं बेंचमार्कपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग समजला जातो. Mid Cap Mutual Funds हे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात, आणि त्यांच्याजवळ भविष्यात चांगली वाढ घडवून आणण्याची क्षमता असते. ते चांगले वाढीचे द्योतक असले तरी, त्यांच्यासोबत जोखीम देखील येते. ते Large Cap Stock पेक्षा जोखमीचे असतात परंतु Small Cap Stock पेक्षा कमी जोखमीचे असतात. SIP बद्दल बोलायचं झाल्यास इथे केलेल्या गुंतवणूकीची संख्या 2 लाख कोटी एवढी झाली असून हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेने 28 टक्यांनी आधीक आहे.

Leave a Comment