MS Dhoni: महेंद्र सिंह धोनी किंवा माही आपल्या भारताचा माजी कर्णधार फक्त एक यशस्वी क्रिकेटपटूच नाही तर एक चतुर गुंतवणूकदार देखील आहे. 1,040 कोटींहून अधिक रुपयांच्या नेटवर्थसह, धोनीची संपत्ती त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपलीकडे जाते. विविध क्षेत्रातील त्याच्या गुंतवणुकीने त्याच्या आर्थिक यशात मोठा वाटा उचलला आहे. चला तर आता आपण धोनीच्या गुंतवणूक साम्राज्याच्या आणि त्याला यशस्वी उद्योजक बनवणाऱ्या विविध उद्योगांचा थोडा आढावा घेऊया.
धोनीची ‘ही’ आहेत पैसे कमावण्याची साधने: (MS Dhoni)
धोनी हा प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँड ‘Seven’ चा मालक आहे आणि हा ब्रँड फॅशनचा शौक ठेवणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध बनला आहे. Brand Revenue व्यतिरिक्त, धोनीची जाहिरातीच्या करारांमधूनही चांगली कमाई होते. फॅशनच्या क्षेत्राच्या पलीकडे, धोनीने राँची येथे ‘Mahi Residency’ नावाच्या मध्यम स्वरूपाच्या हॉटेलमध्ये पाऊल टाकले आहे. हे हॉटेल Airbnb, OYO आणि MakeMyTrip सारख्या लोकप्रिय हॉस्पिटॅलिटी प्लॅटफॉर्मवर सुलभतेने लिस्टेड आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या अतिथींना सेवा देऊ शकते.
शिक्षणाची आवड असलेल्या धोनीने बेंगलोरमध्ये MS Dhoni School ची स्थापना केली. ही CBI इंग्रजी माध्यमिक शाळा विद्यार्थ्यांना सर्वांगीण शैक्षणिक अनुभव प्रदान करते. शाळेत आधुनिक शिक्षण पद्धतींचा वापर केला जातो, तसेच मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना अद्वितीय शिक्षण संधी दिल्या जातात(MS Dhoni). धोनीने पेय पदार्थ उद्योगातही मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने-7 ink brews या पेय पदार्थ आणि चॉकलेट्स बनवणाऱ्या ब्रँडसोबत हातमिळवणी केली आहे. धोनीच्या सिग्नेचर हेलिकॉप्टर शॉटवर आधारित, या ब्रँडने ‘Copter 7’ हा एक अनोखा पेय पदार्थ लाँच केला आहे.